भरमैदानात अश्विन अन् जडेजा भिडले, सर्वांसमोर सुरू झाला राडा; रोहितने सांगितलं वादामागचं खरं कारण

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना झाला आहे. ४ सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला आहे. तसेच आससीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवले आहे.

पहिल्यात सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने शतक ठोकले आहे. तसेच रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलने सुद्धा अर्धशतक ठोकत भारतीय संघाला ४०० धावांपर्यंत पोहचवण्यात मदत केली. पहिल्या सामन्यात अश्विन आणि जडेजा यांनी दोघांनीही खुप चांगली कामगिरी केली.

अशात रोहितने अश्विन आणि जडेजासोबतचा सामन्यातील एक प्रसंग सांगितला आहे. कर्णधार म्हणून कशी कसरत करावी लागते हे या प्रसंगातून दिसून येते. अश्विन आणि जडेजा हे दोघेही मला एकाचवेळी ओव्हर मागते होते, असे रोहित शर्माने सांगितले आहे.

भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला फक्त १७७ धावा करता आल्या होत्या. त्यामध्ये जडेजाने ५ विकेट्स घेतल्या होत्या, तर अश्विनने ३ विकेट्स घेतल्या होत्या.  तर मोहम्मद शमी आणि सिराजने प्रत्येकी १-१ विकेट घेतली होती. त्यानंतर भारताने फलंदाजीला येऊन ४०० धावा केल्या.

भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात अश्विनने ५ विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. त्यावेळी मैदानात जे घडलं त्याबद्दल रोहित शर्माने खुलासा केला  आहे. सामना जिंकल्यानंतर तो इरफान पठाणशी बोलत होता.

रोहित म्हणाला की, संघाचे नेतृत्व करताना खुप कसरत करावी लागते. भारतीय खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळत असते. त्यामुळे ३ फिरकीपटूंना घेऊन खेळणं कठीण काम असतं. फिरकीपटूंना ड्रेसिंग रुममध्ये सांभाळणं सोपं असतं पण मैदानावर त्यांना कसं सांभाळावं असा प्रश्न पडतो.

पुढे रोहित म्हणाला की, खेळत असताना जडेजा माझ्याकडे आला आणि म्हणााला की, माझ्या २४९ विकेट्स झाल्या आहेत मला ओव्हर दे. मला २५० विकेट्स पुर्ण करायच्या आहे. तर अश्विन माझ्याकडे आला आणि म्हणाला की, मला ओव्हर दे माझ्या ४ विकेट्स झाल्या आहेत. मला ५ विकेट्स पुर्ण करायच्या आहेत. अशा गोष्टीमुळे मी मध्येच अडकलो आहे.

महत्वाच्या बातम्या-
मंत्रिपद मिळताच संदीपान भुमरेंनी टाकली ९ दारुची दुकाने अन्…; अजित पवारांचा गौप्यस्फोट
संतापजनक! मोलकरणीला नग्न करुन गुप्तांगावर मारहाण, पाच महिने एक रुपयाही दिला नाही
अजित पवारांना मुख्यमंत्री करणार का? शरद पवारांनी एका वाक्यात संपवला विषय; म्हणाले…