गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते पक्ष सोडणार अशी चर्चा होती. असे असतानाच आता काही नेते राष्ट्रवादीला रामराम ठोकताना दिसत आहे. राष्ट्रवादीतील काही नेते हे शिंदे गटात जात आहे, तर काही नेते हे भाजपमध्ये जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यात एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दशरथ तिवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
तसेच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने दशरथ तिवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे समोर आले आहे. ठाण्यात राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे समोर आले आहे.
दशरथ तिवरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. पण आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
तालुका युवक काँग्रेस, टीडीएस बँक अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य. जिल्हापरिषद सदस्य, जिल्हापरिषद सभापती, मुंबई बँकेचे संचालक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या दशरथ तिवरे यांनी पार पाडल्या होत्या. पण गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा होती.
अखेर नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत तिवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. शनिवारीच प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता लगेच तिवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला गळती लागल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
भरमैदानात अश्विन अन् जडेजा भिडले, सर्वांसमोर सुरू झाला राडा; रोहितने सांगितलं वादामागचं खरं कारण
मंत्रिपद मिळताच संदीपान भुमरेंनी टाकली ९ दारुची दुकाने अन्…; अजित पवारांचा गौप्यस्फोट
पुण्याच्या पोटनिवडणूकांमध्ये झाला सर्वात मोठा उलटफेर; जाणून घ्या नेमकं काय घडलं