ऋषभ पंतबद्दल अनेकांनी तक्रार केली होती की तो आपली विकेट सहज गमावून बसतो. त्याच्या आक्रमक खेळात निष्काळजीपणा कधी येतो, याची काळजी अनेक तज्ज्ञांना पडायची. पण रविवारी पंत मँचेस्टरमध्ये वेगळ्या अवतारात दिसला. परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजूण घेऊन त्याने उत्कृष्ट खेळी केली.
पंत क्रिजवर आला तेव्हा आघाडीचे दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. नजर स्थिरावली तोपर्यंत विराट कोहली आणि नंतर सूर्यकुमार यादवही बाद झाले होते. येथून हार्दिक पांड्याने डावाची धुरा सांभाळली. पंड्याने अधिक आक्रमक खेळ केला जेणेकरून धावगतीचे कोणतेही दडपण येऊ नये.
दुसऱ्या टोकाकडून येणाऱ्या धावांमुळे पंतचा आत्मविश्वास वाढला. सेट झाल्यावर पंतने धावा काढण्याचा वेग पकडला. त्याने पहिल्या 50 धावा 71 चेंडूत आणि पुढचे अर्धशतक 35 चेंडूत पूर्ण केले. तो 125 धावांवर नाबाद परतला. या शानदार खेळीनंतर या भारतीय यष्टीरक्षकाने कोणती रणनीती अवलंबली हे सांगितले.
पंत म्हणाला, ‘आशा आहे की माझे पहिले वनडे शतक मला आयुष्यभर लक्षात राहील. पण जेव्हा मी फलंदाजी करत होतो तेव्हा एकावेळी फक्त एकाच चेंडूवर लक्ष केंद्रित करत होतो. पंत फलंदाजीला आला तेव्हा भारताची धावसंख्या दोन बाद २५ अशी होती.
तो म्हणाला, ‘जेव्हा संघ दडपणाखाली असतो आणि तुम्ही अशी फलंदाजी करता तेव्हा तुम्हाला प्रेरणा मिळते.’ पंत म्हणाला, ‘मला इंग्लंडमध्ये खेळायला आवडते आणि माझ्या खेळाचा आनंद घेण्यासाठी मला जे काही करावे लागेल ते मी करेन. तुम्ही जितके जास्त क्रिकेट खेळाल तितका अनुभव तुम्हाला मिळेल.
एकदिवसीय मालिकेतील फलंदाजीसाठी ही सर्वात अनुकूल विकेट असल्याचे पंतने सांगितले. इंग्लंडला 260 धावांवर रोखणाऱ्या गोलंदाजांना श्रेय जाते. तो म्हणाला, ‘गोलंदाजांनी या सामन्यातच नव्हे तर संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केली. आणि केवळ या मालिकेतच नाही तर वर्षभर ते चांगलेच गाजले असे पंत म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा; उद्धव यांचे भाजपवर ‘ठाकरी’ बाण
शिवसेनेच्या खासदारांचे बंड सपशेल फसले; लोकसभा सचिवालयाने स्वीकारले नाही पत्र कारण…
झटपट काम आईच्या हातांना आराम! 14 वर्षीय चिमुकलीने आईसाठी बनवलं 8 कामं करणारं मशीन
सोन्याची नाही तर हिरा.., गोल्ड डिगर आणि लालची म्हणणाऱ्यांना सुष्मिताने दिले सडेतोड उत्तर