वेड चित्रपटाने सध्या मराठी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला आहे. रितेश आणि जेनेलियाने सगळ्या चाहत्यांना वेड लावले आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांचा वेड चित्रपट चर्चेत आहे. ३० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने काही दिवसातच ३५ कोटींपेक्षा जास्त पैसे कमावले. तसेच या चित्रपटाने सैराटचाही रेकॉर्ड मोडला.
सध्या या चित्रपटाला लोकांनी डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटाचे सर्व शो फुल सुरू आहेत. या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. अनेक कलाकारांनी वेड चित्रपटातील गाण्यांवर व्हिडीओ आणि रील्स बनवले आहेत. त्यामध्ये आर्चीचा म्हणजे रिंकू राजगुरूचाही समावेश आहे.
या चित्रपटाद्वारे रितेशने दिग्दर्शनात पाऊल टाकले तर दुसरीकडे त्याची पत्नी जेनेलिया देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले आहे तरीही या चित्रपटाने दमदार कामगिरी करत सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने सैराटचा विक्रम मोडत एकाच दिवसात ५.७० कोटींचा गल्ला जमवला आहे.
एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड सैराटच्या नावावर होता पण तो रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढला. आता सैराटच्या आर्चीलाही वेड चित्रपटाचे वेड लागले आहे असं म्हणायला हरकत नाही. आर्चीने वेड चित्रपटाच्या गाण्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
तिने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केलं आहे. या रीलमध्ये तिने वेड चित्रपटातलं सुख कळले हे गाणं वापरलं आहे. या व्हिडीओमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसलेली आहे, तर कपाळावर लाल रंगाची टिकली, हातात लाल रंगाच्या बांगड्या, गळ्यात मोत्यांची माळ घातली आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत आहे.
केसांच्या अंबाड्यावर पांढरा गजरा मळला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. आर्चीचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणत आहेत की, आर्चीलाही वेड चित्रपटाचे वेड लागले आहे. एवढंच काय तिचा हा व्हिडीओ रितेश देशमुखनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CnJSJ4eh9TB/?hl=en
महत्वाच्या बातम्या
मुश्रीफांच्या घरावर धाड टाकताना ईडीकडून झाली मोठी चूक; सत्य कळताच घेतला काढता पाय
विलासराव देशमुखांचे पुत्र अमित देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार; ‘या’ बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेनाप्रमुख, उद्धव ठाकरेंचे पद बेकायदेशीर; निवडणूक आयोगात हायहोल्टेट ड्रामा
ठाकरे गटाची मोठी खेळी, सुप्रीम कोर्टात केली ही मोठी मागणी, शिंदे गटाचे टेंशन वाढणार