Politics: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे सुरूच आहेत. सकाळी ६ वाजल्यापासूनच अधिकारी कसुन चौकशी करत आहेत. घराकडे जाणारे सर्व रस्ते सीआरपीएफ पोलिसांनी बंद केले आहेत.
या विषयावर बोलताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, हे छापे राजकारण्यांना, विशेषत: त्याविरोधात बोलणाऱ्यांना त्रास देण्यासाठी सरकारने आखलेला एक डाव आहे.
अप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यातील १०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
मुश्रीफ हे मनी लाँड्रिंग आणि बेनामी व्यवहारात गुंतले असल्याचा दावा त्यांनी यापूर्वी केला होता. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या असल्याचे सोमय्या म्हणाले होते. तसेच सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा नावेद यांच्या चौकशीची मागणी केली होती.
दरम्यान, आता हसन मुश्रीफ यांच्या घरावर इडीने छापा टाकला. तब्बल २६ अधिकाऱ्यांच्या पथकाने कागदपत्रांची छाननी केली. परंतु, यावेळी अधिकार्यांकडून फार मोठी चुक झाल्याचे समजत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
पहाटे हसन मुश्रीफ यांचे घर समजून ईडीच्या आधिकार्यांनी एक उद्योगपतीच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर खूप उशीर ही चुक आधिकार्यांच्या लक्षात आली. त्यावेळी तात्काळ आधिकार्यांनी काढता पाय घेतला.
त्यानंतर पहाटे सहा वाजल्यापासून मुश्रीफांच्या कोल्हापूर, पुणे आणि मुंबईतल्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. पण त्यांच्या हाती काहीच न लागल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- कमाईच्या बाबतीत सैराटला मागे टाकणार वेड;९ दिवसातच तोडला सैराटचा रेकॉर्ड, कमावले इतके कोटी
- “गोपीचंद पडळकर हे स्वतः मंगळसुत्रचोर आणि पाकीटमार, त्यांना चोपल्याशिवाय राहणार नाही”
- आता हसन मुश्रीफ यांचा नंबर? किरीट सोमय्यांचे ट्विट चर्चेत, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ