लातूरमधून मोठी बातमी येत आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचे विधान भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे. निलंगेकर यांच्या वक्तव्याने लातूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
आमदार अमित देशमुख आपला राजकीय वारसा आणि सत्ता जपण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग अवलंबत असल्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटले आहे. या वक्तव्यानंतर लातूर जिल्ह्यात राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय म्हणाले संभाजी पाटील निलंगेकर? निलंगेकर यांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निलंगेकर यांच्या वक्तव्याने लातूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
आपला राजकीय वारसा आणि सत्ता स्थापन करण्यासाठी आमदार अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा निलंगेकर यांनी केला आहे. भाजप युवा मोर्चाच्या बैठकीत ते बोलत होते. पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले की, अमित देशमुख भाजपमध्ये येण्यास तयार असतील, पण आम्ही त्यांना भाजपमध्ये घेणार नाही.
तर निलंगेकर पुढे बोलताना म्हणाले, काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांचा भाजपमधील प्रवेश माझ्या कार्यकर्त्यांना आवडणार नाही, असे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सद्यातरी पडदा पडला आहे.
देशमुख हे लातूरचे प्रिन्स राजकुमार आहेत. सतत सत्तेत राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. असे असले तरी जनतेचे प्रश्न कधीच देशमुख यांनी मांडले नाहीत असंही संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. यासदर्भात अमित देशमुख यांती प्रतिक्रीया अजून समोर आली नाही.
संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वक्तव्याने लातूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. लातूरच्या राजकारणावर देशमुख घराण्याचे वर्चस्व आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. देशमुख कुटुंबाला लातूर जिल्ह्यात मोठा जनाधार आहे. अनेक संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे.
मात्र आता अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य निलंगेकर यांनी केले आहे. अमित देशमुख यांनी हातात कमळ घेतल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. जिल्ह्यातील काँग्रेसची संपुर्ण धुरा त्यांच्याच खांद्यावर आहे. ते राज्यातील मोठे नेते आहेत.
महत्वाच्या बातम्या
देशाची सत्ता असणाऱ्या अमित शहांना दिल्ली सांभाळता येत नाही हे ‘या’ वरून सिद्ध होते; शरद पवारांची जहरी टिका
ईडीने ठणकावले! देशमुख आणि मलिकांना मतदान करू देणार नाही, कैद्यांना मतदानाचा अधिकारच नाही
तिने देशासाठी गोल्ड मेडल जिंकलं; पण ती दलित असल्यामुळे तिच्या स्वागताला कुणीच गेलं नाही