Share

“नवरात्रीत, गणेशोत्सवात, भीम जयंतीत डीजे लागतात, तेव्हा मुस्लिमांना त्रास होतो, पण ते तक्रार करत नाही”

राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे खाली घ्यावे, नाही तर आम्ही लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवू असे वक्तव्य केले होते. त्यामुळे काही नेते राज ठाकरेंचे समर्थन करत आहे, तर काही नेते राज ठाकरेंवर टीका करत आहे. (ramdas aathwale criticize raj thackeray)

महाराष्ट्रासोबतच देशभरात या मुद्याला वाचा फुटली आहे. गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेशातही हिंदू संघटना भोंगे हटवण्यासाठी पुढे येताना दिसून येत आहे. अशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावरची आपली भूमिका मांडली आहे.

भोंग्याविरोधी भूमिका संविधानाच्या विरोधात असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. भोंगे काढण्याचा विषय राज ठाकरेंनी करु नये. भोंगे काढण्याचे सोंग राज ठाकरेंनी करु नये. दादागिरी फक्त तुम्हाला करता येते असं अजिबात नाही. दादागिरीला दादागिरीने सुद्धा उत्तर दिलं जाऊ शकतं, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

तसेच मंदिरात ज्यांना भोंगे लावायचेत त्यांनी भोंगे लावावे. नवरात्र उत्सव, गणपती उत्सव, भीम जयंती, शिवजयंती असते तेव्हा मोठे डीजे असतात. त्याचा मुस्लिमांना त्रास होतो. मात्र त्यांची याबद्दल काहीही तक्रार नसते. त्यामुळे अजानसंदर्भात भोंगे काढण्याची भूमिका ही संविधानाच्या विरोधात आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

तसेच मशिदींवरील भोंगे काढण्याची भूमिका संविधानाच्या विरोधात तर आहेच, सोबत ती समाजात, धर्माधर्मात वाद निर्माण करणारी आहे. राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करावा, असे मत रामदास आठवलेंनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे.त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो व्यक्ती असो वा संघटना त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मशिदीजवळ तोडफोड करणारा बुलडोजर मंदिराजवळ येताच का थांबला? लोकांनी कारवाईवर उपस्थित केले प्रश्न
…त्यामुळे चड्डीत राहायचं काय समजलं? मनसेची थेट अमोल मिटकरींना धमकी
संतापजनक! 13 वर्षीय चिमुकलीवर तब्बल आठ महिने 80 नराधमांकडून बलात्कार, पोलिसांची मोठी कारवाई

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now