ड्रामा क्वीन राखी सावंतवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या आई जया सावंत यांचे निधन झाले आहे. त्या दीर्घकाळापासून ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने त्रस्त होत्या. राखीची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती आणि तिच्यावर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
राखीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राखी हॉस्पिटलमधून अनेकदा तिच्या आईचे आरोग्य अपडेट्स देत असे. राखीचे व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने बोलताना अनेकवेळा आईच्या प्रकृतीची माहिती देताना दिसली होती.
ती चाहत्यांना आईसाठी प्रार्थना करायला सांगतानाही दिसली. जया यांच्या निधनामुळे राखी आणि तिच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्व चाहत्यांनी अभिनेत्रीच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. राखी सावंतने मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, तिची आई जया यांचे निधन झाले आहे. आई आता राहिली नाही.
राखी सावंतने सांगितले की, तिची प्रकृती गंभीर होती. कर्करोग किडनी आणि फुफ्फुसात पसरला होता. बोलता बोलता राखी रडू लागली. आईच्या मृत्यूच्या वेळी राखी तिच्यासोबत होती. राखी सावंतची आई जया गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यांच्यावर सतत उपचार सुरू होते. सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. बिग बॉस मराठीतून बाहेर आल्यानंतर राखी सावंतला तिच्या आईच्या तब्येतीची माहिती मिळाली. तिने लगेच हॉस्पिटल गाठले. आईच्या आजाराबाबत तिने चाहत्यांना सांगितले. राखीने सलमान खान आणि मुकेश अंबानी तिला सतत आर्थिक मदत करत असल्याचा खुलासाही केला होता.
दरम्यान, आपल्या आईच्या निधनाने राखी पुर्णपणे तुटून गेली आहे. नुकताच तिचा एक रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती म्हणत होती की, माझ्या आईसाठी प्रार्थना करा. चाहत्यांनीही तिला सांगितले होते की, आम्ही तुझ्यासोबत आहोत.
महत्वाच्या बातम्या
नवरदेव सतत जात होता नवरीच्या खोलीत, कारण कळताच उडाला भडका; लग्नमंडपातच तुफान राडा
प्रेम करत होती म्हणून वडीलांनीच केला डॉक्टर मुलीचा खून; नंतर मृतदेहासोबत केले असे काही की..
केएल राहूल पाठोपाठ अक्षर पटेलनेही बांधली लग्नगाठ; पहा लग्नाचे सुंदर फोटो
‘कितीही खोके दिले तरी ठाकरेंशी गद्दारी करणार नाही, पैसा व सत्तेसाठी बाप बदलणारी औलाद आपली नाही’