सध्या देशभरात उत्तर प्रदेश निवडणूकीची चर्चा सुरु आहे. अशात भाजप कोणत्या नेत्यांना कोणत्या मतदार संघातून तिकीट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. असे असतानाच भाजपने एक हैराण करणारा निर्णय घेतला आहे. भाजपने ईडीचे माजी अधिकारी राजेश्वर सिंह यांना विधानसभा निवडणूकीचे तिकीट दिले आहे.
सोमवारी केंद्र सरकारने ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह यांना स्वेच्छानिवृत्ती दिली आहे. त्यानंतर भाजपने लखनऊच्या सरोजिनी नगर मतदारसंघातून सुपर कॉपमधून राजकारणात पदार्पण करणाऱ्या राजेश्वर सिंह यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे राजेश्वर सिंह चांगलेच चर्चेत आले आहे.
दरम्यान, राजेश्वर सिंह यांनी सुलतानपूर हा त्यांचा घरचा जिल्हा सोडून सरोजिनी नगरमधून लढण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच विशेष म्हणजे माजी पोलीस अधिकाऱ्यांनी लखनऊला आपले कार्यक्षेत्र सांगितले आहे.
राजेश्वर सिंह हे लखनऊमधील ईडीचे सहसंचालक म्हणून कार्यरत होते. सोमवारी त्यांनी ट्विटमध्ये जाहीर केले की ते निवृत्त होत आहेत. त्यांनी सोमवारी रात्री ट्विटरवर पोस्ट केलेल्या पत्रात म्हटले आहे की, २४ वर्षांच्या अथक आणि प्रामाणिक परिश्रमाचा काफिला आज एका महत्त्वपूर्ण वळणावर पोहोचला आहे.
ईडीचे सहसंचालक राजेश्वर सिंह यांच्या व्हीआरएसच्या मंजुरीनंतर २४ तासांच्या आत भाजपने त्यांना लखनऊमधील सरोजिनी नगरमधून तिकीट दिले. जेव्हा राजेश्वर सिंह यांनी व्हीआरएसची घोषणा केली तेव्हा सर्वप्रथम ते गाझियाबादच्या साहिबाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.
त्यानंतर राजेश्वर सिंह हे सुलतानपूरच्या त्यांच्या गृहजिल्ह्यातील सदर जागेवरून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्याऐवजी ते लखनऊमधून राजकीय लढाईत उतरले. राजेश्वर सिंह यांनी उत्तर प्रदेश पोलिसांतून नागरी सेवा करिअरची सुरुवात केली. त्यांनी सुमारे १० वर्षे उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये आणि उर्वरित वर्षे ईडीमध्ये काम केले.
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १७ उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या आठव्या यादीत भाजपने योगी सरकारच्या मंत्री स्वाती सिंह यांचे तिकीट कापले आहे. स्वाती सिंह यांचे पती दयाशंकर सिंह यांनाही भाजपने तिकीट दिलेले नाही. स्वाती सिंह यांच्या सरोजिनी नगर मतदारसंघातून भाजपने माजी ईडी अधिकारी राजेश्वर सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये ३०० कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी पोलिसानेच केले अपहरण; असा आखला होता प्लॅन
दादागिरी आली अंगलट! पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल
जेव्हा लीक झाली होती सलमान खानची ऑडिओ टेप, प्रिती झिंटासोबतच्या नात्याची झाली होती चर्चा