Share

..तर लाॅकडाऊन लावण्याचा विचार करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले लाॅकडाऊनचे संकेत

राज्यात दररोज आढळणाऱ्या करोना रूग्णांचा आकडा साडेबारा हजाराच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट आणि स्पष्ट उत्तर दिलं. राजेश टोपे यांनी राज्यातील करोना रूग्णांची आकडेवारी सांगत सध्या आढळणाऱ्या रूग्णांपैकी ९० टक्के रूग्ण केवळ ४ जिल्ह्यातील असल्याचंही नमूद केलं.

बाकीच्या राज्यात कुठेही इतके रूग्ण नाहीत. त्यामुळे जिथं रूग्ण नाहीत तिथं लॉकडाऊन येण्याचा संबंध येत नाही. अद्याप राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत कोणताही विषय चर्चेला नाही. उपलब्ध बेडपैकी ४० टक्के बेड भरले तर लॉकडाऊनचा विचार करतो, असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

 

येत्या काळात मोठा धोका

राजेश टोपे म्हणाले, पहिल्या लाटेत वीस लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. दुसऱ्या लाटेत 40 लाख लोक कोरोनाबाधित झाले, दुर्देवाने कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यात जवळपास 80 लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता आहे. ३ जानेवारीचे आकडे पाहिले तर साडेबारा हजारपेक्षा अधिक करोना रूग्ण आहेत. मुंबईमध्येच ९ हजारच्या दरम्यान रूग्ण आहेत. ४ जिल्ह्यांमध्ये ९० टक्के रूग्ण असल्याचे टोपे यांनी नमूद केले.

 

काय म्हणाले नेमकं राजेश टोपे

केंद्राने लवकरात लवकर औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा.

त्याबरोबरच लॉकडाऊन आणि कोरोनाचे निर्बंध देशभर कसे असावेत? याची केंद्राने एक नियमावली तयार करून द्यायला हवी.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबतही तिसऱ्या लाटेच्या आनुषंगाने अनेक मागण्या केल्या आहेत.

लवकरच तेही आमच्या मागण्या मान्य करतील असेही राजेश टोपे यावेळी म्हणाले.

 

दरम्यान, अजित पवार म्हणाले होते, आमचं पाचच दिवसांचं अधिवेशन होतं. या ५ दिवसात १० मंत्री आणि २० हून अधिक आमदार करोनाग्रस्त झालेत. हे अधिवेशन आणखी वाढवलं असतं तर निम्मे मंत्री आणि निम्मे आमदार करोनाग्रस्त झाले असते. यावरून सगळ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. मी तर सभागृहातील व्यक्ती माझ्या बाजूचा आहे की विरोधी बाजूचा आहे हा भेदभाव केला नाही. सगळ्यांना आवाहन केलं.

यावेळी अजित पवारांनी कार्यक्रमाला गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमात मी उपस्थित राहणार नाही, असा सज्जड इशारा दिला. तसेच मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी, गर्दी कमी व्हावी यासाठी १ तास आधीच जातो आणि उद्धाटन करतो, असं नमूद केलं. अजित पवार हे वारंवार नागरिकांसह त्यांच्या सहकाऱ्यांना देखील मास्क आणि कोरोनाबाबतच्या इतर सूचना देताना आढळून येतात.

महत्वाच्या बातम्या :-
‘मी हे आयुष्य जगले पण तू मला जिवंत केलंस’; सिंधूताईंच्या आठवणींनी भावूक झाली अभिनेत्री
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच येणार नवी मालिका; ‘या’ हिंदी मालिकेचा आहे रिमेक
प्रभासच्या ‘राधेश्याम’ चित्रपटावर कोरोनाचे सावट; निर्मात्यांनी प्रदर्शनाबाबत घेतला मोठा निर्णय

आरोग्य

Join WhatsApp

Join Now