Homeताज्या बातम्यास्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच येणार नवी मालिका; 'या' हिंदी मालिकेचा आहे रिमेक

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच येणार नवी मालिका; ‘या’ हिंदी मालिकेचा आहे रिमेक

साधरणतः एका भाषेतील चित्रपट इतर भाषेत रिमेक करण्याचा प्रकार सर्वांनाच परिचित आहे. तर चित्रपटांप्रमाणे अनेक मालिकांचेही इतर भाषेत रिमेक करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. त्यात स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते ?’ ‘मुलगी झाली हो’, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकासुद्धा इतर भाषेतील मालिकांचे रिमेक आहेत. आता त्याच धर्तीवर स्टार प्रवाह वाहिनीवर पुन्हा एक नवीन रिमेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘लग्नाची बेडी’ असे या नव्या मालिकेचे नाव आहे.

स्टार प्लस या हिंदी वाहिनीवर ‘गुम है किसीके प्यार है’ ही प्रसिद्ध मालिका आहे. या मालिकेत आयोशा सिंग, नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. आता याच मालिकेचे मराठीत ‘लग्नाची बेडी’ या नावाने रिमेक करण्यात आले आहे. तर मराठीत अभिनेत्री सायली देवधर, रेवती लेले आणि अभिनेता संकेत पाठक हे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत.

नुकतीच या नव्या मालिकेचा प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. मालिकेच्या प्रोमोत दाखवण्यात आले की, नायिकेच्या वडिलांचा मृत्यू झालेला असतो. तर तिच्या वडिलांच्या मृत्यूला नायिका एका पोलीस अधिकाऱ्याला  जबाबदार ठरवते आणि त्याचा द्वेष करू लागते. मात्र, नंतर त्याच पोलीस अधिकाऱ्याशी नायिका लग्न करताना दिसून येते.

प्रोमोमध्ये पुढे ट्विस्ट दाखवण्यात आले की, पोलीस अधिकाऱ्याची एक प्रेयसीसुद्धा आहे आणि ती या लग्नामुळे रागाभरात तिथून निघून जाते. या मालिकेत अभिनेता संकेत पाठक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री सायली देवधर नायिकेची भूमिका साकारत आहे. तर पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेयसीची भूमिका अभिनेत्री रेवती लेले साकारत आहे.

दरम्यान, प्रोमो पाहून मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. तर स्टार प्रवाह वाहिनीवर ३१ जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार दुपारी १ वाजता ही मालिका प्रसारित करण्यात येणार आहे. तर ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास किती यशस्वी ठरेल हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

विकी-कतरिनानंतर ‘या’ बाॅलीवूड जोडप्याच्या लग्नाची चर्चा; नवरी आहे मराठमोळी तर नवरदेव…
सिंधूताईंची भूमिका करणारी अभिनेत्री माईंच्या निधनानंतर कोलमडली; म्हणाली घरातलं कुणी गेल्यावर..
‘पोरक्यांना आपलसं करणाऱ्या माई गेल्या अन् महाराष्ट्र पोरका झाला’; माईंच्या निधनाने हळहळला अभिनेता
हेच का ‘सब का साथ?’ शेकडो महिलांच्या ऑनलाईन लिलावावरून जावेद अख्तरांचा मोदींना सवाल