Share

पुण्यातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकाला अजित पवारांच्या नावाने धमकी, मागितली २० लाखांची खंडणी

आताच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर करून पुण्यातील एका मोठ्या बिल्डरला खंडणी मागण्यात आली आहे. खंडणी मागण्यासाठी आरोपींनी एका अँपचा वापर केला आहे. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेच्या एका पथकाने सापळा रचून ६ जणांना अटक केली आहे.

अँपचा वापर करून आरोपींनी अजित पवार यांच्या नावाने बिल्डरला फोन केला होता. या संदर्भात बांधकाम व्यावसायिक अतुल जयप्रकाश गोयल ( वय-४७, रा. वानवडी ) यांनी बंडगार्डन पोलीस पाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात पोलिसांनी नवनाथ भाऊसाहेब चोरमले ( वय २८, रा. हवेली ) , सौरभ नारायण काकडे ( वय २०, रा. हहडपसर ), बाळा गौतम वाघमारे (वय २८,रा. हवेली) यांच्यासह आणखी तीन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण काकडे हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याने गुगल प्ले स्टोरवरील फेक कॉल नावाचे अँप डाउनलोड केले. त्या अँपमधून त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर केला. त्या अँपवरून किरणने दहा दिवसांपूर्वी बांधकाम व्यावसायिक अतुल गोयल यांना फोन केला होता. अतुल गोयल त्यांना तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आहे, असे वाटले.

फोनवरून किरणने आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पी ए चौबे बोलतोय असे भासविले. हवेली तालुक्यातील शिरसवडी येथील जमिनीसंदर्भातील वाद मिटवून टाका. वाद मिटवला नाही तर तुमचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर अतुल गोयल यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. गोयल यांना याबाबत शंका आली. त्यामुळे त्यांनी गुन्हे शाखेकडे या संदर्भात तक्रार दिली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्यानुसार गोयल यांना खंडणीची रक्कम घेऊन बंडगार्डेन रोडवरील एका इमारतीत बोलावले. पोलिस त्या ठिकाणी साध्या गणवेशात हजर होते. गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तिघे जण २ लाख रुपये घेण्यासाठी त्या इमारतीत आले होते. आणखी तिघे जण इमारतीखालीच थांबले होते.

त्या आरोपींनी पैसे घेतल्याबरोबच पोलिसांनी झडप घालून त्यांना पकडले. बाकीच्या इतर आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय जाधव, अजय थोरात आणि अमोल पवार यांच्या पथकाने केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
बापरे! सातवी पास युवकाने ३० हजारात बनवली ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी..
‘या’ स्मार्टफोनने ओप्पो आणि विवोलाही टाकले मागे, 10 सेकंदात विकले 116 कोटींचे फोन
“मराठी पाट्यांच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचे वाटोळे होणार, त्यामुळे निर्णय रद्द करावा, अन्यथा…”

राज्य

Join WhatsApp

Join Now