Homeताज्या बातम्या“मराठी पाट्यांच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचे वाटोळे होणार, त्यामुळे निर्णय रद्द करावा, अन्यथा...”

“मराठी पाट्यांच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचे वाटोळे होणार, त्यामुळे निर्णय रद्द करावा, अन्यथा…”

राज्यातील दुकानांवर आणि आस्थापनांमध्ये मराठी भाषेत ठळक अक्षरांमध्ये नामफलक लावणे बंधनकारक असेल असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत केले जात आहे. तर प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाला विरोध केला असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. हा निर्णय रद्द व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देणार, असा इशाराही गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.

राज्यातील दुकांनावर मराठी भाषेतील पाट्या असाव्यात, असा नियम राज्य सरकारने केला होता. मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. अनेक दुकानदार त्यातून पळवाटा काढताना दिसून येत होते. याबाबत अनेक तक्रारीही येत होत्या. काहींनी तर दुकानाच्या एका कोपऱ्यात मराठीत नावे लिहिली होती.

त्यामुळे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ या अधिनियमात बदल करण्याची मागणी केली जात होती. यासाठी अनेक राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात आले होते. यासंदर्भात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच एक बैठक घेतली होती. या बैठकीत अधिनियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयानंतर अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर व्यापारी वर्गाकडून मराठी पाट्यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. असे असताना गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हा निर्णय राज्य सरकारने लवकरात लवकर रद्द करावा, नाहीतर आम्हाला उच्च न्यायालयात जावे लागेल, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

व्यापाऱ्याला त्याच्या अधिकारानुसार दुकानाची मांडणी आणि सादरीकरण करण्याचा अधिकार आहे. राजकारणासाठी भेद निर्माण करायचा आणि व्यापाऱ्यांना त्रास होईल असा निर्णय घेऊन त्यांचे वाटोळे करायचे असं सगळं सुरु आहे, अशी टीकाही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात नशीब! 22 वर्षांपूर्वी हरवलेले 8 कोटींचे सोने कुटुंबाला मिळाले परत…
‘जोहान्सबर्गमध्ये जर विराट कर्णधार असता तर टिम इंडिया हारली नसती’, माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य
कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिराने ओलांडल्या सर्व मर्यादा, शेअर केला बिकीनी घातलेला हॉट फोटो