Homeइतर‘या’ स्मार्टफोनने ओप्पो आणि विवोलाही टाकले मागे, 10 सेकंदात विकले 116 कोटींचे...

‘या’ स्मार्टफोनने ओप्पो आणि विवोलाही टाकले मागे, 10 सेकंदात विकले 116 कोटींचे फोन

iQOO ने अलीकडेच तिची iQOO 9 सिरीज लॉन्च केली. या सीरिज अंतर्गत iQOO 9 आणि iQOO 9 Pro हे दोन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. आज गेल्या आठवड्यात या स्मार्टफोन्सची पहिली विक्री सुरू झाली. चीनमधील पहिल्या सेलमध्ये या दोन्ही हँडसेटला युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या 10 सेकंदात 100 मिलियन युआन म्हणजे सुमारे 116.25 कोटी रुपये किमतीचे फोन विकले गेले.

चीनमध्ये, कंपनीने हे स्मार्टफोन अनेक वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. iQOO 9 हा स्मार्टफोन 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येतो. त्याची सुरुवातीची किंमत 3,999 युआन म्हणजे सुमारे 46,500 रुपये आहे. तसेच iQOO 9 Pro हा स्मार्टफोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये देखील येतो.

चीनमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत 4,999 युआन म्हणजे सुमारे 58 हजार रुपये आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.78-इंच फुल एचडी + डिस्प्ले आहे. सिरीजच्या प्रो वेरीएंटमध्ये CURVED AMOLED LTPO डिस्प्ले आणि क्वाड HD + रिझोल्यूशनसह येतो.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. iQOO 9 च्या मागील बाजूस, कंपनी 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 12-मेगापिक्सेल टेलीफोटो सेन्सरसह 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स देत आहे. त्यामुळे यामध्ये फोटो आणि व्हिडीओची क्वालिटी ग्राहकांना खुप पसंत आली आहे.

प्रो व्हेरिएंटमध्ये गिम्बल आणि OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 16-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, कंपनी दोन्ही स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. या फोन्समध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेटसह 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.

बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4700mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनला ग्राहकांची खुप पसंती मिळत आहे. अवघ्या काही सेकंदात 100 मिलियन युआन म्हणजे सुमारे 116.25 कोटी रुपये किमतीचे फोन विकले गेले आहेत.