महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त केलेल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच ठाण्यात घेतलेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंगे ३ मे पर्यंत उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. जर ३ मे पर्तंत भोंगे खाली आले नाही, तर देशभरात हनुमान चालिसा लावू असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. (pravin togdia angry on bjp)
राज ठाकरेंच्या या भूमिकेवर अनेक नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. सत्ताधारी नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे, तर भाजप नेत्यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मशिदींवरील भोंग्याचा वाद वाढतच चाललेला दिसून येत आहे.
आता भाजपने या मुद्याला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडियांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. राज्यात भाजपचं सरकार असताना भोंगे का काढले नाहीत? असे म्हणत प्रवीण तोगडियांनी राज्यातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
भाजपने भोंगे उतरविण्याचं समर्थन केलं आहे. हरकत नाही. चांगली गोष्ट आहे. पण भोंगे प्रकरणावर दुटप्पी भूमिका घेण्यापेक्षा आधी भाजपचं सरकार असलेल्या राज्यांतील मशिदींवरील भोंगे उतरवा, असे आवाहन प्रवीण तोगडिया यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्रात भाजप सरकार असतानाही मशिदींवरील भोंगे होतेच. परंतू तेव्हा ते का काढण्यात आले नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
देशात रात्री १० ते सुर्योदयापर्यंत भोंगे वाजवण्यात येऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दिले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांमधील जिल्हाधिकारी तसेच पोलिसांना तसे आदेश द्यावे, असेही प्रवीण तोगडिया यांनी कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.
तसेच उत्तर प्रदेशमधील भोंगे उतरवण्यात यावे, अशी मागणी आम्ही १० वर्षांपूर्वीच केली होती, असेही प्रवीण तोगडिया यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रवीण तोगडिया यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. मात्र मध्यंतरी त्यांचा संघटनेतील काही नेत्यांशी वाद झाला, त्यामुळे ते व्हीएचपीतून बाहेर पडले आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना केली होती.
महत्वाच्या बातम्या-
इफ्तार पार्टीत ‘या’ व्यक्तीने सलमान खानला बळजबरीने केला किस, व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण
सोनम कपूरच्या घरी करोडोंची चोरी करणाऱ्या आरोपींना अटक; चोरीचे कारण ऐकून धक्का बसेल
‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजलने दिला मुलाला जन्म; सोशल मीडियावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव