Share

प्रकाश आंबेडकरांचे ईडीला थेट आव्हान; म्हणाले, गां** दम असेल तर मला उचलून दाखवा आणि मग…

ईडीची कारवाई आणि केंद्र सरकारच्या भूमिकांवर राज्य सरकारने नेहमी प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेकदा महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये यावरून वाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. पण भाजप नेहमी आमचा यामध्ये काहीही हात नाही असे सांगत असते.

भाजपच्या सांगण्यावरून केंद्रीय तपास यंत्रणा सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने वारंवार केला आहे. सध्या यावरून बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे. उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत. भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही.

मलाही ईडीची नोटीस दिली होती, ###दम असेल मला उचलून दाखवून कारवाई करावी असे थेट आवाहन त्यांनी भाजपला दिलं आहे. पण हे सर्व बोलताना त्यांची जीभ घसरली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यावेळी त्यांनी इतर काही मुद्द्यांवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, निवडणुकीबाबत दिलेल्या निर्णयावर ताबडतोब निर्णय घ्या हे सांगण्या ऐवजी तुम्ही निर्णय घ्या हे सांगणे घटनेला धरून नाही. तसेच सभा अस्तित्वात नसतांना टॅक्स गोळा करण्याचा अधिकार आहे? पुढे ते म्हणाले की, यावर सगळ्या पक्षांनी आपलं मत मांडले पाहिजे, हे त्यांनी स्पष्ट केलं.

धार्मिक राजकारणावर बोलताना त्यांनी दंगलीवर भाष्य केलं. ते म्हणाले की, काश्मीर मध्ये साडे तीन जिल्हे आहेत. ज्याठिकाणी 5 लाख आर्मी उभी करूनही हा भाग ताब्यात घेऊ शकले नाही. मुस्लिमांमधील वर्ग आणि हिंदू मधला वर्ग या दोघांनी आता पूर्ण ताबा घेतला पाहिजे तरच अशा दंगली थांबतील, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडलं.

महत्वाच्या बातम्या
प्रकाश आंबेडकरांची भाजपवर टीका करताना जीभ घसरली, म्हणाले, गां** दम असेल तर…
प्लेऑफमधून बाहेर गेलेल्या मुंबईला आणखी एक धक्का, पुढच्या IPL मध्येही अपयशच हाती?
VIDEO: वडिलांची तुफान खेळी पाहून अश्विनच्या लेकीचा आनंद गगणात मावेना, स्टॅंडवरच केला भन्नाट डान्स

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now