मला वाटत नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आयकर विभाग, ईडी किंवा सीबीआयचा गैरवापर करत आहेत. ते जे करत आहेत, ते कायद्याच्या कक्षेत राहूनच कार्य करत आहेत. सत्ता टिकवण्यासाठी आवश्यक ते काम ते करत आहेत. त्यांच्या जागी मी असतो तर मीही असेच केले असते.
कायद्याच्या कक्षेत राहून आपली खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करण्यात गैर काहीच नाही. यापूर्वी ज्यांनी सरकार स्थापन केलं त्यांनीही असंच केलं आहे असं हैराण करणारं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर बोलत होते.
चार दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे गटाशी हातमिळवणी केली आहे. त्यांना महाविकास आघाडीत चौथा पक्ष म्हणून सामील व्हायचे होते, मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा याला विरोध होता त्यामुळे त्यांना ठाकरे गटाशी आघाडी करण्यातच समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत त्यांच्या मनात आधीपासूनच राग आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे.
प्रकाश आंबेडकर असेही म्हणाले की, गेल्या 40 वर्षांच्या राजकारणात मी पाहिले आहे की, जो कोणी सत्तेवर येईल त्याला विरोधकांना एकजूट होताना बघायचे नाही. अशा स्थितीत विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हा राजकीय डावपेचाचा भाग आहे. सत्ताधारी पक्षाला मजबूत का होऊ द्यायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शुक्रवारीच सोलापुरातील सभेत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा खरपूस समाचार घेतला होता. महाविकास आघाडी ही निवडणूकपूर्व युती नाही. निवडणुकीनंतर शिवसेना भाजपपासून वेगळी झाली, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.
आपली वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाशी असलेली युती ही उत्तम आणि नैतिकदृष्ट्या मजबूत युती असल्याचे ते म्हणाले. ही निवडणूकपूर्व युती असून ती यशस्वी होईल, असेही ते म्हणाले. शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांंवर टीका करणे टाळले. महाविकास आघाडीचे नाव घेऊन ते टीका करत होते.
काही दिवसांपुर्वी त्यांनी पवारांचे नाव घेऊन विधान केले होते की, शरद पवार भाजपला मिळालेले आहेत. याची लवकरच सर्वांना कल्पना होईल. यावर संजय राऊत म्हणाले की, त्यांनी ठाकरे गटाशी युती केली आहे. त्यांना लवकरच महाविकास आघाडीत सामिल करून घेतले जाईल. याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत बोलताना काळजी घ्यावी.
याला उत्तर देताना पत्रकारांनी प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया विचारली असता प्रकाश आंबेडकर थेट म्हणाले की, ‘कोण आहे संजय राऊत? ते आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते नाहीत. युतीबाबत जर उद्धव ठाकरे काही म्हणाले तर मी त्यांचं ऐकेन असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
लग्नाच्या 4 दिवसांनी लगेचच केएल राहुलने चाहत्यांना दिली गुडन्युज, पत्नी अथिया शेट्टीही झाली खूश
प्रेम करत होती म्हणून वडीलांनीच केला डॉक्टर मुलीचा खून; नंतर मृतदेहासोबत केले असे काही की..
उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार? प्रसिद्ध उद्योगपतीच्या माध्यमातून दोघांमध्ये चर्चेला सुरवात? वाचा आतली बातमी
पहा जेनेलीया डिसूझा आणि रितेश देशमुखच्या लग्नाचे कधीही न पाहीलेले सुंदर फोटो






