जेनेलिया आणि रितेश देशमुख सध्या त्यांच्या वेड चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या वेड चित्रपटाने काही दिवसातच ५० कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. त्यांची लव्हस्टोरीही हटके आहे. बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपलमध्ये त्यांची गणना होते. दोघेही एकमेकांना जवळपास १० वर्षे डेट करत होते.
त्यानंतर दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहे ज्यांची नावं रायन आणि राहिल आहेत. जेनेलियाने नुकतीच एक मुलाखत दिली ज्यामध्ये तिने तिच्या आणि रितेशच्या सुखी संसाराचे गुपित सांगितले. जेनेलियाने सांगितले की, ते जेव्हा एकमेकांना डेट करत होते आणि लग्न झाल्यानंतर त्यांना अनेकजण त्यांच्या सुखी संसाराबद्दल प्रश्न विचारतात.
यावर ती नेहमी म्हणते की, ती बोलण्यावर विश्वास ठेवते आणि हे अनेक कपल्समध्ये पाहायला मिळत नाही. रितेशचे कौतुक करताना जेनेलिया म्हणाली की, त्यांच्यात कधीही भांडण होत नाही आणि याचे कारण तिचा पती रितेश आहे. ती म्हणाली की, मला यासाठी रितेशचे कौतुक करावेसे वाटते की तो कोणत्याही विषयाचा मुद्दा बनवत नाही.
सगळ्यांमध्ये बोलण्याची हिम्मत असायला हवी. सुरूवातीला आम्ही आमच्या समस्या एकमेकांना सांगत नव्हतो पण नंतर हे करायची इच्छा होत होती. हे केल्याने आम्हाला कळू लागले की आम्ही नाराज का आहोत. अशाप्रकारच्या गोष्टी आमचे नाते टिकून ठेवण्यास मदत करतात.
जेनेलिया पुढे म्हणाली की, आम्ही खुपच सिस्टेमॅटिक लाईफस्टाईल फॉलो करतो. आमची लाईफस्टाईल खुप अनुशासित आहे आणि कोणत्याची रिलेशनशिपमध्ये हे महत्वाचे आहे. लोकांना वाटते की, आम्ही वेळेचे इतके पालन का करतो? रितेशला हे कधीच वाटत नाही की प्रत्येक काम हे मुलीचीच जबाबदारी आहे.
पुढे जेनेलिया म्हणाली की, तो खुप सपोर्टीव्ह पती आहे, असं जेनेलिया म्हणाली. तिने यावेळी रितेशचे तोंडभरून कौतुक केले. दरम्यान, रितेश आणि जेनेलियाच्या वेड या चित्रपटाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला. या मराठी चित्रपटाने हिंदी चित्रपटांनाही तगडी टक्कर दिली.
महत्वाच्या बातम्या
आनंद दिघेंच्या जयंतीदिवशीच शिंदे गटाने बदललं आनंद आश्रमाचं नाव; ‘हे’ आहे नवे नाव
सूर्याने मोडला पाकिस्तानचा माज; बाबर-रिझवानला डावलून ICC ने सुर्याला दिले ‘हे’ खास बक्षीस
पठाणचा करेक्ट कार्यक्रम! बजरंग दलाचे कार्यकर्ते काठ्या घेऊन सिनेमागृहात, ‘या’ ठिकाणी शो रद्द
सिंधुदुर्गात भाजप शिवसेनेत तुफान हाणामारी; शिवसेनेच्या वैभव नाईकांनी हातात दांडकं घेतलं अन्..