Share

प्राजक्ता माळीच्या गळ्यातील दागिना पाहून सोनू सुदने दिली ‘ही’ रिऍक्शन, वाचा पुर्ण किस्सा

प्राजक्ता माळी तिच्या अभिनयामुळे ओळखली जाते. पण ती आता कवयित्री आणि एक बिझनेस वुमन देखील झाली आहे. नुकताच तिने प्राजक्तराज नावाचा आपला दागिन्यांचा ब्रॅंन्ड सुरू केला आहे. उद्योगक्षेत्रात तिने पहिलं पाऊल टाकलं आहे. अस्सल पारंपारिक मराठमोळे दागिन्यांची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी तिने हे पाऊल उचललं आहे असं ती म्हणाली.

सगळीकडून सध्या तिचं कौतुक होत आहे. अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी तिचं अभिनंदन केलं आहे. नुकतीच प्राजक्ता माळी आणि सोनू सुदची भेट झाली. झालं असं की, प्राजक्ता माळीने अलीकडेच विदर्भातील प्रसिद्ध ब्रम्हपुरी महोत्सवाला हजेरी लावली होती.

यावेळी तिथे तिची भेट बॉलिवूड स्टार सोनू सुदशी भेट झाली. सोनू सुद तिथेच हजर होता. या महोत्सवाबद्दल प्राजक्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिनं म्हटलं आहे की, या महोत्सवात प्राजक्तराज विषयी महोत्सवाइतकं बोललं गेलं की मी भारावून गेले, खुप आभार.

तसेच ती असंही म्हणाली की, प्राजक्तराजचं पहिलं प्रदर्शन विदर्भात लावणार. यादरम्यान, प्राजक्ताच्या दागिन्यांविषयी सोनू सुदने दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. तिनं गळ्यात घातलेला दागिना पाहून सोनू सुद म्हणाला की, गळ्यातलं युनिक आहे.

हे तेच डिझाईन होतं जे प्राजक्तराजने डिझाईन केलं होतं. त्या दागिन्याचं नाव होतं वज्रटिक. हे डिझाईन सोनू सुदला खुपच आवडलं. तो म्हणाला, हे खुपच युनिक आहे. दरम्यान, प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर खुप ऍक्टीव्ह असते. नुकतंच तिचं एक पुस्तक प्रकाशित झालं.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये ती निवेदनही करते. अनेक मराठी चित्रटातही तिने काम केलं आहे. रानबजार या प्लानेट मराठीच्या वेब सिरीजमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती जी खुप गाजली होती. सोशल मिडीयावर तिच्या ड्रेसिंग सेन्सची चाहते नेहमी स्तुती करत असतात.

महत्वाच्या बातम्या
पुतण्याच्या मृत्युनंतर आक्रोश करता करता काकूनेही सोडले प्राण, वाचून काळीज फाटेल
धक्कादायक! साईभक्तांना घेऊन जाणार्‍या बसचा भीषण अपघात, १० भाविकांचा मृत्यू
सूर्या-विराटने मैदानातच मारली राहुलला मिठी, रोहित-द्रविडनेही दिली शाबासकी, भारताच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
5 लाखांच्या हार्ले डेव्हिडसन बाईकवर दूध विकायला गेला ‘हा’ मुलगा, लोक म्हणाले, ‘शौक बडी चीज है’

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now