रेल्वे अपघाताच्या घटना आपण अनेकवेळा पाहिल्या आहेत. रोज रेल्वे दुर्घटनेच्या बातम्या समोर येत असतात. यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. जळगावमधूनही अशीच एक बातमी समोर आली आहे. पाचोरा शहरातील हनुमान नगर येथील एका २७ वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागला आणि त्याचा जागीच मृत्यु झाला.
तरूणाचा मृत्यु झाल्यानंतर पुर्ण कुटुंबीयांना धक्का बसला होता. त्यातल्या त्यात काकूला मोठा धक्का बसला होता. त्याची काकू खुप दुखाच होती. आक्रोश करत असताना काकूला तीव्र हृद्यविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं पण रस्त्यातच त्यांचा मृत्यु झाला.
किरण मोरे असे रेल्वेचा धक्का लागून मरण पावलेल्या तरूणाचे नाव आहे. त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावलेल्या महिलेचे नाव उषाबाई मन्नु सोनार आहे. त्यांचे वय ४० होते. एकाच दिवशी पुतण्या आणि काकूची मयत निघाल्याने पुर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
पाचोरा शहरातील ते रहिवासी होते. दादाभाऊ मोरे आणि त्यांच्या दोन्ही भावांचे कुटुंब एकाच ठिकाणी राहतात. ११ जानेवारीला दादाभाऊ मोरे हे त्यांच्या काकाच्या उत्तरकार्यासाठी वरखेडी तालुका पाचोरा येथे गेले होते. उत्तरकार्य उरकून आल्यानंतर त्यांचा लहान मुलगा किरण मोरे हा कामासाठी शहराच्या दुसऱ्या भागाकडे चालला होता.
जात असताना तो पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकावर पोहोचला. यावेळी तो रेल्वे लाईन क्रॉस करत होता. रेल्वे लाईन क्रॉस करत असताना मुंबईहून जळगावला जाणाऱ्या रेल्वेचा त्याला जोरदार धक्का लागला. हा धक्का इतका भीषण होता की, जाग्यावरच त्याने प्राण सोडले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. किरणच्या मृत्युची बातमी कळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश सुरू केला. आक्रोश करत असताना किरणची काकू उषाबाई मन्नु सोनार यांना ह्रदयविकाराचा झटका आला.
त्यांना शहराकडील खाजगी रुग्णालयात नेत असताना त्यांनीही रस्त्यातच प्राण सोडले. एकाच दिवशी दोन घटनांमुळे हनुमान नगर परिसरातील लोक हादरून गेले आहेत. गुरूवारी सकाळी १० वाजता पुतण्या आणि काकूची एकाच ट्रॅक्टरवर अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी पुर्ण परिसर हळहळला होता.
महत्वाच्या बातम्या
अनोख्या मैत्रीची राज्यभर चर्चा, मित्र सरपंच झाला म्हणून दिली नवीकोरी फॉर्च्युनर
‘आज तो खोटा सिक्का काम आ गया’, मॅचविनिंग इनिंगनंतरही राहुलची उडवली जातेय खिल्ली; सोशल मीडियावर मीम्सचा महापूर
इंदोरीकर महाराजांच्या सासूंची जोरदार चर्चा, सरपंच झाल्यानंतर ‘या’ पक्षात होणार सामिल
बायकॉट बॉलीवुड सोडून, आता ट्विटरवर ट्रेंड करत आहे #BollywoodSwaha, जाणून घ्या काय आहे कारण?