Share

एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार; शिंदे गटातील मंत्र्याने केला मोठा गौप्यस्फोट

Politicians : मागच्या वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात भलंमोठं राजकीय महानाट्य घडवून आणले होते. यामध्ये त्यांनी मूळ शिवसेनेतील 40 आमदारांना फोडून भाजपचे बोट धरत राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन केले. यामध्ये सगळ्यात मोठे नुकसान शिवसेनेचे झाले.

शिवसेना ठाकरे व शिंदे या दोन गटात विभागली गेली. या दोन्ही गटात अजूनही आरोप- प्रत्यारोप व टीकायुद्ध सुरूच आहे. दरम्यान, शिंदे गटातील नेते व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अगामी काळात शिंदे व ठाकरे एकसंघ होऊ शकतात. असा धक्कादायक खुलासा केला आहे.

राज्यात राजकीय सत्तांतर झाल्यानंतर शिंदे व ठाकरे यांच्यातील वाद अगदी विकोपाला गेले आहेत. परंतु, असे असताना देखील शिर्डी येथील एका कार्यक्रमात बोलताना दीपक केसरकर यांनी शिंदे व ठाकरे एकत्र येण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. मात्र, यासाठी त्यांनी एक अट सुद्धा ठेवली आहे.

शिवसनेतील लोक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे लोकं सहजासहजी एकमेकांना सोडून जात नाहीत. शिवसेनेतील एवढे लोक शिंदे गटाला जाऊन मिळाले, याचा अर्थ निश्चितपणे असे काहीतरी घडले आहे, ज्यामुळे लोक नाराज होऊन शिवसेनेतून बाहेर पडली.

यामध्ये नेमकी कोणती गोष्ट घडली याचे आत्मपरिक्षण उद्धव ठाकरे यांनी करावे. जर उद्धव ठाकरेंनी स्वतः आत्मपरिक्षण केले तर शिंदे आणि ठाकरे एकत्र येऊन शिवसेना पुन्हा एकदा एकसंध व्हायला वेळ लागणार नाही. असे केसरकर म्हणाले आहेत.

याशिवाय उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपल्याला आदर असल्याचे देखील केसरकर यांनी बोलून दाखवले आहे. तसेच शिंदे व ठाकरे यांच्यातील कटूता कमी करणे उद्धवजींच्या हातात असून मी त्यांचा आदर ठेवणारा मनुष्य आहे, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच ‘या’ अभिनेत्रीवर होत जिवापाड प्रेम पण…
rishabh pant : ऋषभ पंत दारु पिऊन गाडी चालवत होता? उत्तराखंड पोलिसांनी समोर आणले अपघाताचे सत्य
सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली होती, नव्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीची गूढ पोस्ट, लिहिले- पुढच्या वेळी मी…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now