Nana Patekar: प्रसिद्धी अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी त्यांच्या कलेच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 साली रायगड जिल्ह्यात झाला आहे. त्यांच खरं नाव विश्वनाथ पाटेकर आहे. परंतु, त्यांना नाना पाटेकर या नावाने ओळखले जाते. आज नाना पाटेकर यांच नाव दिग्गज कलाकारांच्या यादीत समावेश आहे.
पाटेकर यांना एकापेक्षा एक सरस चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील देण्यात आला आहे. पाटेकर मनोरंजन विश्वात जितके चर्चेत असतात. तितकेच ते वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत असतात. त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आहे.
नाना पाटेकर यांच्या वडिलांचा छोटासा व्यवसाय होता. पण एके दिवशी त्याच्या वडिलांच्या जवळच्या मित्राने त्यांची फसवणूक केली. त्याच्या मालमत्तेसह सर्व काही मित्राने त्याच्या नावावर केले. या घटनेनंतर अभिनेते नाना पाटेकर यांचे कुटुंब रस्त्यावर आले होत. त्यामुळे वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी नाना पाटेकर काम करण्यास सुरुवात केली.
चुनाभट्टी येथे चित्रपटांचे पोस्टर रंगवण्यासाठी नाना रोज 8 किलोमीटर चालत जायचे. हे काम केल्यानंतर नाना यांना महिन्याला अवघे 35 रुपये मानधन मिळायचे. त्यांनंतर पाटेकर चित्रपट सृष्टीत सक्रीय झाले. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर हे 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री मनीषा कोईराला डेट करत होते. त्यावेळी त्यांचे अफेअर प्रचंड चर्चेत होते.
नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला ‘खामोशी: द म्युझिकल’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटात नाना आणि मनीषा यांनी वडील आणि मुलीची भूमिका साकारली होती. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे. यानंतर नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांचा ‘अग्निसाक्षी’ हा आणखी एक चित्रपट आला.
नाना पाटेकर अनेकदा अभिनेत्रीच्या घरी ये-जा करताना दिसत होते. मात्र, त्यांचे नाते शेवटपर्यंत पोहोचू शकले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नाना पाटेकर आधीच विवाहित होते आणि त्यांना आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. तर दुसरीकडे मनीषा कोईरालाही नाना पाटेकर यांच्यावर लग्नासाठी सतत दबाव टाकत होती.
या सगळ्यात नाना आणि मनीषा यांच्यात मतभेद वाढू लागले, त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाला. मनीषा कोईराला यांनी नेपाळी उद्योगपती सम्राट दहलसोबतही लग्न केले होते. अभिनेत्री मनिषाचे लग्न केवळ काही वर्षे टिकले आणि त्यानंतर तिने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला.
महत्वाच्या बातम्या-
भारतातील ‘या’ गावात पहाटे ३ वाजता उगवतो सूर्य अन् दुपारी ४ वाजताच होतो सुर्यास्त; जाणून घ्या कारण…
jalgaon : जळगावकरांचा नाद करायचा नाय! गोमुत्र पिऊन केले नववर्षाचे दणदणीत अन् खणखणीत स्वागत
इंडियाचा उपकर्णधार होताच सूर्याचा कहर; गोलंदाजांना धू धू धूतले, फक्त ४० चेंडूत ठोकल्या ९५ धावा