Pankaja munde | भाजपने २०२४ लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही भाजपने रणशिंग फुंकले आहे. जे पी नड्डा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नड्डा यांनी चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली.
या सभेला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पण नड्डा यांच्या या सभेत वेगळीच चर्चा रंगली. पंकजा मुंडे नाराज आहेत असं बोललं जात आहे. झालं असं की, जेपी नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातल्या कार्यक्रम पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचं नावच नव्हतं.
औरंगाबाद सभेदरम्यानही पंकजा मुंडेंनी जे पी नड्डा यांच्यासमोर फक्त ३० सेकंद भाषण केलं, त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जेपी नड्डा यांना या सभेला येण्यास उशीर झाला. त्यांना उशीर झाल्यामुळे पंकजा मुंडे यांना भाषणासाठी केवळ दोन मिनीटांचा वेळ देण्यात आला.
राष्ट्रीय अध्यक्षांना जास्त वेळ भाषण करता यावं म्हणून पंकजा मुंडेंनी अगदी काही सेकंदांचं भाषण केलं. भाषण संपवताना त्या म्हणाल्या की, पक्षाचे आदेश मानणं हे माझ्यावरचे संस्कार आहेत. तसेच त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. जाताना त्यांनी भाजपला जिंकवून देण्याचं आवाहनही केलं.
नाराजीच्या चर्चा रंगल्यानंतर पंकजा मुंडेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, माझं नाव निमंत्रण पत्रिकेत असण्याचं कारण नाही, कारण हा लोकसभा मतदारसंघ माझा नाही. पण म्हणून मी नाराज आहे असं म्हणणं चुकीचं आहे. तसेच मला भाषणासाठी कमी वेळ दिला असं म्हणणंही चुकीचं आहे. वेळ कमी होता आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचं भाषणं महत्वाचं होतं, असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.
पुढे त्या म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे होते त्यावेळीही आणि त्यांच्यानंतरही माझा संघर्ष सुरू आहे. संघर्षातून शिकायला मिळतं. सध्या राज्याच्या राजकारणात जे सुरू आहे, त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम तयार होतो. लोकांमध्ये दुफळी निर्माण होते. महापुरूषांबद्दल बोलणं टाळलं पाहिजे. सर्वच महापुरूषांच्या नशिबी संघर्ष होता, असंही त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
आईच्या दोन्ही किडण्या फेल, ४ बहीनी, २ छोट्या भावांची जबाबदारी; दिल्लीच्या अंजलीची रडवणारी कहाणी
मेंदूत लिंबाएवढी गाठ, थोडीही गडबड झाली तर पॅरालिसीस पक्का; पण चिमुरड्याचे धाडस अन् डाॅक्टरांची कमाल
६० मुलांना जन्म देऊनही पत्नी समाधानी नाही, म्हणते अजून मुलं पाहीजेत; पतीला म्हणते आणखी लग्न करा
pune : जिथे भाईगिरी केली तिथेच पोलिसांनी काढली धिंड, पुण्यातील तरुणांचा व्हिडिओ पुन्हा आला समोर