Share

ताई नाही तर भाजपही नाही, मराठवाड्यातून कमळ हद्दपार करा; भडकलेल्या मुंडे समर्थकांचा मोठा निर्णय

सध्या राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडींमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभा निवडणूकीसोबतच विधानपरिषदेचीही चर्चा सुरु आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी प्रत्येकी दोन उमेदवारांना रिंगणात उतरवलं आहे. (pankaja munde supporter angry on bjp)

तसेच भाजपनेही त्यांच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि पाचव्या जागेवर उमा खापरे असणार आहे. या सर्वांना उमेदवारी भेटली पण पंकजा मुंडे यांना उमेदवारी न भेटल्यामुळे त्यांचे समर्थक आता नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.

ताई नाही, तर भाजप नाही अशी कठोर भूमिका आता कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तसेच संपूर्ण मराठवाड्यातून कमळ हद्दपार करण्याची मागणी कार्यकर्ते करताना दिसून येत आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीत पंकजा मुंडे यांना संधी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, पण भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही, त्यामुळे कार्यकर्ते खुपच नाराज झालेले आहे.

मराठवाड्यातील राजकारणातील ज्वलंत नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे यांनी ओळख आहे. पण अनेकदा त्यांना पक्षश्रेष्ठींपुढे शांत राहावं लागलं आहे. यंदा त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती, या निमित्ताने त्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सक्रीय होतील, असे म्हटले जात होते, पण तसे झाले नाही.

तसेच संधी मिळाली तर त्या संधीचं नक्कीच सोनं करीन, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी आमच्या भागातून भाजपला हद्दपार करु असा इशारा दिला आहे.

मराठवाड्यात पंकजा मुंडे समर्थकांनी संताप व्यक्त करत बॅनरबाजी सुरु केली आहे. ताई नाही, तर भाजप नाही असे संदेश कार्यकर्ते देताना दिसून येत आहे. तसेच सध्या एक पोस्टर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका कार्यकर्त्याने ताईंना विधान परिषदेची उमेदवारी न दिल्यामुळे गंगाखेड तालुक्यातून कमळला हद्दपार करा, असे म्हटलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
बिग बॉसमधील फेमस कपल झालं वेगळं, शमिता शेट्टी-राकेश बापट झाले वेगळे, ‘या’ कारणामुळे झाले ब्रेकअप
सलमान खानचे ६ पॅक आहेत बनावट, व्हिडीओमुळे संपूर्ण प्रकार आला समोर, नेटकरीही झाले हैराण
प्रेमाच्या खेळपट्टीवर पृथ्वी शॉ बोल्ड, प्राची सिंहसोबत झालं ब्रेकअप, वाचा कोण आहे प्राची सिंह?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now