Share

भारताला ‘दहशतवादाचा बालेकिल्ला’ म्हणत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात ओकले विष, भारतानेही दिले चोख प्रत्युत्तर

काश्मिरी दहशतवाद्यांचे पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानने ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’ या उक्तीचा प्रत्यय घेऊन पुन्हा एकदा भारताविरोधात विष पेरले आहे. 1989 पासून भारताने 96,000 काश्मिरींची हत्या केल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अकरम यांनी केला आहे.(pakistan-calls-india-stronghold-of-terrorism-india-respondss)

भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, भगवा पक्षाशी संलग्न अतिरेकी हिंदू गट भारतात मुस्लिमांच्या हत्याकांडावर उघडपणे बोलत आहेत. पाकिस्तानच्या या खोटेपणाला भारताने ओसामा बिन लादेनचा (Osama bin Laden) उल्लेख करत चोख प्रत्युत्तर दिले. भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा पर्दाफाश केला.

भारतीय मुत्सद्दी मधु सुदान यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने नियुक्त केलेल्या दहशतवाद्यांची सर्वाधिक संख्या पाकिस्तानात आहे. इस्लामाबादची पोल उघडत भारताने असेही म्हटले आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ओसामा बिन लादेनसह इतर दहशतवाद्यांना पाठिंबा दिला आहे.

जम्मू-काश्मीर आणि लडाखचा संपूर्ण परिसर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पुढेही राहील, असे भारताने एकदा स्पष्ट केले होते. यापूर्वी पाकिस्तानने काश्मीरमधील कथित अत्याचाराकडे लक्ष देण्याची आणि त्याला जबाबदार असलेल्या भारतीय अधिकारी आणि नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी सुरक्षा परिषदेकडे केली होती.

अफगाणिस्तानपासून पीओकेपर्यंत दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने भारत हा दक्षिण आशियातील दहशतवादाचा गड बनल्याचा दावा केला आहे. आपल्या आदिवासी भागात कार्यरत असलेल्या तहरीक-ए-तालिबानला (Tehreek-e-Taliban) भारतीय गुप्तचर संस्थांची मदत मिळत असल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे.

ब्रिटनची राजधानी लंडनमधील तुर्कीशी संबंधित लॉ फर्म (स्टोक व्हाईट) ने अलीकडेच काश्मीरमधील कथित युद्ध गुन्ह्यांसाठी भारताचे गृहमंत्री अमित शाह आणि लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर काश्मीरमध्ये कथितरित्या राहणाऱ्या 2 हजार लोकांच्या जबाबांचा अहवालही त्यांनी लंडन पोलिसांना सादर केला आहे.

काश्मीरमध्ये भारताकडून होत असलेल्या ‘युद्ध गुन्हे’ आणि ‘हिंसा’चा हा पुरावा असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. दुसरीकडे, हा पाकिस्तान समर्थित प्रचार असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांचे मत आहे. लंडन पोलिसांच्या युद्धगुन्हेगारी तपास युनिटकडे भारतीय लष्कर, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारीही देण्यात आल्या आहेत.

लॉ फर्मने लंडन पोलिसांना काश्मीरमधील कथित भारतीय गुन्ह्यांची चौकशी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, एका भारतीय सूत्राने सांगितले की, ही लॉ फर्म तुर्कीच्या अधिकार्‍यांशी जोडलेली आहे आणि ती पाकिस्तानच्या वतीने काम करत आहे.

आंतरराष्ट्रीय इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now