सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खुप खराब झाली आहे. करोडो लोकांना तिथे दोनवेळच्या जेवणासाठीही धडपड करावी लागत आहे. महागाई सुद्धा वाढली असून पाकिस्तानला इतर देशांकडून मदत मागावी लागत आहे. पण ६० वर्षांपूर्वी पाकिस्तानची परिस्थिती वेगळी होती.
६० वर्षांपूर्वी पाकिस्तान भारतापेक्षाही सुखी होता. लोकांच्या खिशात चांगला पैसा होता. पण नैसर्गिक आपत्तीमुळे आणि दहशतवादामुळे पाकिस्तानची अशी परिस्थिती झाली की आता लोकांना वेळेवर जेवणही मिळत नाहीये. त्यामुळे पाकिस्तान अमेरिका आणि युएईकडे मदत मागत आहे.
पाकिस्तानवर आलेले हे आर्थिक संकट हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट आहे. या संकटातून बाहेर पडणे पाकिस्तानला खुप कठीण होत असून यातून बाहेर पडण्याचे पर्याय सुद्धा आता संपत चालले आहे. पण अजूनही पाकिस्तानकडे एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे पाकिस्तान या संकटातून बाहेर पडू शकतो.
पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर निघायचे असेल तर त्यामध्ये त्यांच्याकडे असलेले सोने हे महत्वाची भूमिका निभावू शकते. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये सोन्याच्या खाणी आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोने आणि तांबे आहे. त्या सोन्याच्या माध्यमातून ते या आर्थिक संकटातून बाहेर पडू शकतात.
बलुचिस्तानच्या प्रांतात शेकडो टन सोने पडून आहे. अशा परिस्थितीत सोने आणि तांब्याचे विशाल भंडार पाकिस्तानच्या आर्थिक संकटात कामी येऊ शकतात. पण अजून याच्या वापराबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण जर त्यांनी या सोन्याचा आणि तांब्याचा वापर केला तर ते या संकटातून बाहेर पडू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, बलुचिस्तानमध्ये ५९० कोटी टन खनिज साठा आहे. त्यामध्ये प्रतिटन खनिजात ०.२२ टक्के सोने आणि ०.४१ टक्के तांबे आहे. ही खाण इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळील एका सुप्त ज्वालामुखीजवळ आहे.
बलुचितस्तानमध्ये असलेल्या या साठ्यातून पाकिस्तानची गरीबी एका झटक्यात दुर होऊ शकते. पहिल्या चार महिन्यांत येथून २०० किलो सोने आणि १७०० टन तांबे काढण्यात आले होते.त्यावेळी या खाणीत ४०० टन दशलक्ष सोने असल्याचे विशेषतज्ञांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या वनडेपुर्वी टिम इंडीयाला ICC चा मोठा दणका; रोहीत शर्माचे कर्णधारपद धोक्यात
पक्षप्रमुखपद वाचवण्यासाठी ठाकरेंची मोठी खेळी, आयोगाकडे ‘या’ दोन मागण्या करत वाढवलं शिंदेंचं टेंशन
कसबा पोटनिवडणूकीसाठी भाजपचे गोपनीय सर्वेक्षण, नेत्यांची लोकप्रियता तपासली; हैराण करणारी माहिती समोर