सध्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये ODI सुरू आहे. यात भारत १-० ने पुढे आहे. पहिल्या वन-डे मध्ये शुभमन गिलच्या जोरावर भारताला विजय मिळाला. यानंतर आता होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ रायपूर येथे दाखल झाला आहे.
पहिल्या वन-डे सामन्यात शुभमन गिलने द्विशतकी खेळी केली होती. या द्विशतकी खेळीमुळे भारताने ३४९ धावांचे लक्ष न्यूझीलंड समोर ठेवले होते. न्यूझीलंडने शेवटपर्यंत हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न केले. परंतु १२ धावांनी भारताने विजय मिळवला.
आता दुसऱ्या लढतीसाठी संघ रायपूर येथे दाखल झाला आहे. दुसरी लढत शनिवारी होणार आहे. या लढतीपूर्वीच ICC ने भारताला एक चांगलाच धक्का दिला आहे. पहिल्या सामन्यातील खेळीमुळे भारतीय संघाला दंड ठोठावण्यात आला आहे.
हैद्राबाद येथे झालेल्या सामन्यात षटकारांची गती हळू असल्यामुळे हा दंड ICC ने ठोठावला आहे. हा दंड म्हणून पहिल्या सामन्यातील फिमधून ६०% रक्कम वजा करण्यात आली आहे. रेफरीच्या एलिट पॅनलचे प्रमुख जवागल श्रीनाथ यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
ICC च्या २.२२ नियमानुसार दिलेल्या वेळेत षटक पूर्ण न केल्यास त्या षटकामागील खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ यांच्या मॅच फीमधून २०% रक्कम कापली जाते. या नियमानुसार भारतीय संघाला ६०% रक्कम कपात करण्याचा निर्णय सुनावला आहे. ICC चा हा निर्णय रोहित शर्माने मान्य केला आहे.
आता जर दुसऱ्या सामन्यातही षटकांचा वेग कमी राहिला तर कर्णधारावर एक सामन्याची बंदी करण्यात आली. २०२३ च्या आगामी ICC वन डे वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. तसेच या स्पर्धेसोबतच रोहित शर्मा त्याच्या कर्णधारपदाचा कार्यकाळही संपवणार आहे. कर्णधार पदाचा पुढील निर्णय या वन डे वर्ल्ड कप नंतरच घेतला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
क्रिकेटपटू मायकेल क्लार्कला गर्लफ्रेंडने रस्त्यातच चोपले; अर्धनग्न अवस्थेत पळत सुटला क्लार्क
भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने केला ५०० कोटींचा घोटाळा, पोलिस ठोकणार बेड्या
‘BCCI पैसे घेऊन संघात निवड करते’ असा आरोप करणाऱ्या क्रिकेटपटूचा मृत्यू; जंगलात आढळला मृतदेह