कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे पक्ष या निवडणूकीच्या तयारीला लागले आहे. कसबा मतदार संघाच्या निवडणूकीची तारीख जाहीर होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. त्यामुळे भाजपने गेल्या आठ ते दहा दिवसांपासूनच याची तयारी सुरु केली होती.
या मतदार संघात कोणता नेता जास्त लोकप्रिय आहे, याची तपासणी भाजपने एका गोपणीय सर्वेक्षणातून केली आहे. सर्वेक्षणातून तीन नेते खुप लोकप्रिय असल्याचे समोर आले आहे. पण त्यापेैकी एक नेता आणि इतर दोघांपेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचेही समोर आले आहे.
मतदारांमध्ये त्यांच्याविषयी खुप जास्त विश्वास आहे. तिन्ही पण नेते हे कसबा मतदार संघातीलच आहे. तसेच ते महापालिकेचे माजी पदाधिकारी आहे. आता ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप प्रयत्न करताना दिसून येणार आहे.
जर ही निवडणूक बिनविरोध झाली तर टिळक कुटुंबातील सदस्याला ही उमेदवारी मिळू शकते. तसेच या निवडणूकीतून ब्राम्हण समाजाला प्रतिनिधित्व दिला जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही निवडणुक बिनविरोध नाही झाली, तर काय करायचे यासाठी भाजप रणनिती आखत आहे.
कसब्यामध्ये भाजपला समर्थन देणारा मोठा वर्ग आहे. कसब्यात मूळचे कोथरुड आणि सिंहगड रस्ता परिसरात राहणारे १५ ते २० हजार मतदार आहे. त्यामुळे याचा भाजपला फायदा होऊ शकतो. या निवडणूकीबाबत काँग्रेस नेत्यांची सुद्धा चर्चा सुरु आहे.
काँग्रेसने पण या निवडणूकीत आपला उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीची सुद्धा या निवडणूकीबाबत बैठक होणार आहे. कसब्याची जागा ही काँग्रेसची असल्यामुळे महाविकास आघाडीतून एकमत होऊन त्याबाबत दिल्लीला अहवाल पाठवण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
अखेर पंकजा मुंडेंनी सोडले मौन, फडणवीसांना खडसावत म्हणाल्या; भाजप म्हणजे एक व्यक्ती नाही…
समृद्धी ठरतोय मृत्यूचा महामार्ग! भीषण अपघातात बसचा चक्काचूर; पाहून अंगावर काटा येईल
१ तास शेतात श्वास घेण्याचे अडीच हजार रुपये; भन्नाट बिझनेस शोधत शेतकऱ्याने कमावला तुफान पैसा