क्रिकेटविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओडिशाची महिला क्रिकेटर राजश्री स्वैनी ११ जानेवारीपासून बेपत्ता होती. पण आता शुक्रवारी तिचा मृतदेह कटकजवळील घनदाट जंगलात झाडाला लटकलेला आढळला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली.
कटकचे पोलिस उपायुक्त पिनाक मिश्रा यांनी सांगितले की, तिचा मृतदेह अथागढ भागातील गुरडिजाटिया जंगलात एका झाडाला लटकलेला आढळला. राजश्रीच्या प्रशिक्षकाने गुरुवारी कटकमधील मंगलाबाग पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होत. त्यानंतर तिचा शोध घेण्यास सुरुवात झाली होती.
गुरडिजाटिया पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. मात्र, तिच्या शरीरावर जखमा आहे आणि डोळ्यांना इजा झाली आहे. त्यामुळे तिचा खून झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, राजश्रीसह सुमारे २५ महिला क्रिकेटपटू ओडिशा क्रिकेट असोसिएशन (ओसीए) द्वारे बज्रकाबती परिसरात पुद्दुचेरी येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराचा भाग होत्या.
ओडिशा राज्य महिला क्रिकेट संघाची १० जानेवारी रोजी घोषणा करण्यात आली होती परंतु अंतिम यादीत राजश्रीचा समावेश नव्हता. पोलिसांनी सांगितले की, दुसऱ्या दिवशी खेळाडू सरावासाठी टांगी परिसरातील क्रिकेट मैदानात गेले होते, पण राजश्रीने तिच्या प्रशिक्षकाला सांगितले की ती तिच्या वडिलांना भेटण्यासाठी पुरीला जात आहे.
दुसरीकडे, राजश्रीच्या प्रशिक्षकाने सांगितले की, गुरुवारी त्यांनी कटकमधील मंगलबाग पोलिस ठाण्यात तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. गुरडीजाटीया पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
राजश्री ही खूप चनागले खेळाडू होती पण तरीही तिला संघात संधी मिळाली नव्हती. यावर तिच्या चुलत भावाने धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणाला की, राजश्रीने मला फोन केला होता. ती म्हणाली की, इथे पैसे घेऊन निवड करताय त्यामुळे माझी संघात निवड झाली नाही.
महत्वाच्या बातम्या-
अशोक सराफ देताहेत ‘या’ गंभीर आजाराशी झुंज; पत्नी निवेदीता म्हणाल्या ‘त्यांना बोलताही येत नाही…
भाजपच्या बृजभुषणसिंगांनी महाराष्ट्रात येताच केली मोठी चूक; शिवाजी महाराजांबाबत बोलताना म्हणाले…
वेड चित्रपटाला मिळालेलं यश पाहून रितेशची वहिनीही भारावली; म्हणाली, तुम्ही दोघं..