Politics: पुणे येथे काल महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार पहायला मिळाला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, खासदार रामदास तडस हे नेते उपस्थित होते.
मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात होणार होती. यापूर्वी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी उपस्थित कुस्ती शौकिनांसोबत संवाद साधला. दरम्यान त्यांनी उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते सांगण्याचा प्रयत्न केला.
यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांच्या आग्राभेटीचा दाखला दिला. मात्र, यावेळी त्यांच्याकडून एक चूक झाली. आग्राभेटीबद्दल बोलताना ते म्हणाले की, “जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्यात दगाबाजीनं कैद केले होते. तेव्हा उत्तर प्रदेशच्या लोकांनी, आग्रा येथील जनतेने शाहूजी महाराजांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात पाठवण्याचं काम केले होते.”
यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख करण्याऐवजी त्यांनी शाहू असा उल्लेख केला. ही चूक बृजभूषण सिंह यांच्याकडून झाली. याशिवाय मागील ६१ वर्षांपासून महाराष्ट्राचा एकही खेळाडू ऑलंम्पिक पदक जिंकला नाही ही खंत देखील बृजभूषण सिंह यांनी यावेळी बोलून दाखवली.
तसेच “महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये भरपूर क्षमता आहे.” असे म्हणत त्यांनी खेळाडूंवर विश्वास देखील व्यक्त केला आहे. राजकीय नेत्यांकडून ऐतिहासिक संदर्भ देताना चुका होण्याचे प्रमाण आजकाल वाढले आहे. यामुळे नकळत महापुरुषांचा अपमान होतो.
याआधी देखील अनेक बड्या राजकीय नेत्यांकडून अशा प्रकारच्या चुका झाल्या आहेत. यावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण होऊन राजकीय वातावरण ढवळून निघते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या
- कसोटी मालिका जिंकत भारताने घेतला बांगलादेशचा बदला; ‘हे’ खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार
- गरीबीमुळे वडीलांना सोडावी लागली कुस्ती, पण महाराष्ट्र केसरी होत शिवराजने बापाचे स्वप्न साकारले
- sikandar shaikh : वडील हमाली करताना मुलगा पैलवानी करून बनला सिकंद, कुस्तीत जिंकल्या २४ बुलेट अन् थार