सध्या राज्यात कोळशाचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यावरुन भाजप नेते ठाकरे सरकारला सुनावत आहे. पण आता त्यांना उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उत्तर दिले आहे. रेल्वेने सुविधाच नाही दिली, तर कोळसा साठा कसा करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (nitin raut allegetion on modi governent)
कोळसा उपलब्ध आहे, परंतू रेल्वेच्या रेक्स मिळत नाही. रेक्स असलेल्या भागात कोळसा नाही. विरोधक आम्ही कोळशाचा साठा केला नसल्याचे सांगतात. परंतू रेक्स उपलब्ध केल्या नाहीत, तर कोळसाचा साठा कसा करणार? असे म्हणत नितीन राऊतांनी भारनियमावरुन केंद्राकडे बोट दाखवले आहे.
दीक्षाभुमीला भेट दिल्यानंतर नितीन राऊत माध्यमांशी बोलत होते. आजचे वीज संकट फक्त कोळशामुळे आहे.कोरोनानंतर सर्वजण कामाला लागला आहे. दुसरीकडे सणासुदीचा काळ आणि तापमान वाढीने विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळेही मागणी व पुरवठ्यातील दीड हजार मेगावॅटच्या तफावतीने वीज संकट निर्माण झाले, असे नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच ही तफावत जास्त असल्याचे अतिरंजित पद्धतीने विरोधक सांगत आहे. आज सर्व वीजनिर्मिती प्रकल्प सुरु आहे. परंतू आम्ही कोळशाअभावी संपूर्ण क्षमतेने चालवू शकत नाही. केंद्राने आम्हाला कोळशाचा साठा दिला असता तर परदेशातील कोळसा विकत घ्यावा लागला नसता, असा टोलाही नितीन राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.
सध्या विजेची तुट भरुन काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. अजून ग्रामविकास विभागचा ९ हजार कोटींचा निधी मिळायचा आहे. काही अधिकारी ग्रामविकास आणि नगरविकास विभागाच्या निधीवरील व्याज आणि विलंब आकार माफ करा म्हणतात. मग सामन्यांनी काय केले? शासनाला निधी देण्याची विनंती केली आहे, असेही नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या विविध विभागांकडे वीज कंपन्यांचे १८ हजार कोटी थकीत आहे. परंतू उर्जामंत्री लोकांकडे शिल्लक ५०० रुपये मागत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या वादामुळे ते पैसे मिळत नाही. पैसे नसल्याने उर्जा विभागाला कोळसा खरेदी करुन वीज निर्माण करता येत नाही. ही सत्तेतील पक्षांची कुरघोडी आहे, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: बापू तु आया और मुझे ले गया, धोनीचे बोलणे ऐकून अक्षर पटेल ढसाढसा रडला होता, वाचा किस्सा
शिवसेनेच्या बॅनरबाजीला मनसेकडून बॅनरनेच सणसणीत प्रत्युत्तर; थेट मुख्यमंत्र्यांनाच केलं टार्गेट
VIDEO: अजान सुरु झाली अन् इकडनं भीम जयंतीच्या मिरवणूकीचा डीजे आला; पहा पुढे काय घडलं…