Share

“२४ तासांसाठी पोलिसांना बाजूला ठेवा, मग…; नितेश राणेंची शिवसेनेला थेट धमकी

राज्यातील राजकारण सध्या तापलेले आहेत. गेल्या काही दिवसांत राजकारणात अनेक मोठा घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. अशातच राणा दाम्पत्याला अटक झाल्यानंतर ज्या घटना घडल्या त्यांनी राजकारण हादरवून सोडले आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकीत सोमय्यांची गाडीची काच फुटली आणि त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली. त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता मुंबईत भाजपा विरूद्ध शिवसेना संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच आता नितेश राणे यांनीही ट्विट करत शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमधून इशारा दिला आहे की, मातोश्रीत बसलेल्या मर्द म्हणवणाऱ्यांनी पोलिसांना २४ तासांसाठी बाजूला ठेवावं, मग आम्ही हे सगळे थांबवू याची खात्री आहे. नितेश राणे म्हणाले आहेत की, जर दरदिवशी पोलिसांच्या संरक्षणाखाली भाजपा नेत्यांवर हल्ला होत असेल तर त्याला शौर्य म्हणत नाही.

राज्य सरकार पुरस्कृत गुंडागिरी अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेचा आणि ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे. तसेच या प्रकरणात देवेंद्र फडणवीसही संतापले आहेत आणि या हल्ल्याप्रकरणी होम सेक्रेटरी तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहीणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जबाबदारी न पाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी ते या पत्रातून करणार आहेत. फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सोमय्या हे झेड प्रोटेक्शनमध्ये आहेत. किरीट सोमय्या यांनी अधिकृतपणे पोलिसांना कळवलं होतं की मी भेटायला येत आहे.

भेट झाल्यानंतर खार पोलिस स्टेशनबाहेर ७० ते ८० जणांचा जमाव असून तो माझ्यावर हल्ला करणार आहे. तुम्ही रोड क्लिअर करा, मी बाहेर जातो असंही पोलिसांना कळवण्यात आलं होतं. पण पोलिसांनी कुठलीही कार्यवाही न करता शिवसैनिकांच्या गुंडाना हल्ला करण्याची परवानगी दिली असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोमय्या यांनी शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच शिवसैनिकांनी गाडीवर हल्लाच केला नाही असंही ते म्हणाले आहेत. आता या प्रकरणात केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय भूमिका घेतंय? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या
Kabhi Eid Kabhi Diwali : ‘कभी ईद कभी दिवाली’मधून सलमानने अरशद आणि श्रेयसची केली हकालपट्टी? जाणून घ्या सत्य
Sher Shivraj : ‘शेर शिवराज’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी
मुंबई पोलिस आणि उद्धव ठाकरेंच्या संगमताने हा हल्ला झाला, सोमय्यांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now