बिहारमधील लखीसराय येथे अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती काही कामानिमित्त परगावी गेले असताना विवाहितेने तिच्या प्रियकराला घरी बोलावले. अचानक घरी आलेल्या पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर जे घडले ती घटना वाचून कोणाच्याही अंगाचा थरकाप उडेल.
बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील ऋषी पहारपूर या गावात ही घटना घडली आहे. ऋषी पहारपूर या गावातून काही दिवसांपूर्वी रोहित नावाचा तरुण बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबियांनी याबाबतीत मेदनीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बुधवारी अचानक बेपत्ता रोहितचा मृतदेह नदीत सापडला. पोलिसांनी रोहितचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवत या प्रकरणाचा तपास सुरु केला.
पोलिसांच्या तपासात मृत रोहितचे गावातीलच एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणाची आणखी चौकशी केली असता, या घटनेचा सूत्रधार समोर आला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पूरण पासवान हा पाटणा येथे गवंडी होता. कामाच्या निमित्ताने तो जास्त वेळ घराबाहेर राहत असे. या काळात त्याच्या पत्नीचे गावातील रोहित यादव नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले.
पोलिसांनी या घटनेची अधिक माहिती देताना सांगितले की, ३१ डिसेंबरच्या रात्री अचानक पूरण पासवान पाटण्याहून परत आला. यावेळी त्याला त्याची पत्नी रोहितसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली. पुरण पासवानने त्या दोघांना रंगेहाथ पकडले. पासवान त्याच्या पत्नीला काहीच बोलला नाही. पण त्याने रोहित यादवच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले.
त्यांनतर रोहितचा मृतदेह पुरण पासवानने नदीत फेकून दिला. रोहितच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या पत्नीने देखील त्याला साथ दिली. रोहित बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. पोलिसांनी विशेष पथक तयार करून या प्रकरणाचा तपास केला. रोहितच्या कॉल रेकॉर्डचा तपास करताना त्याचे शेवटचे बोलणे पिंकी देवीशी झाल्याचे पोलिसांना आढळले.
पोलिसांनी तातडीने पिंकी देवीला चौकशीसाठी बोलावले. तिच्याकडून चौकशी केली असता, पोलिसांना संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. त्यांनतर पोलिसांनी पुरण पासवान याला पाटणा येथून अटक केली. आरोपी पासवान याने दिलेल्या माहितीवरून, पोलिसांनी एसडीआरएफ टीमच्या मदतीने रोहितचा मृतदेह नदीतून बाहेर काढला.
मुख्य पोलीस अधिकारी रंजन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ही हत्या अनैतिक संबंधातून करण्यात आली आहे. पिंकी देवीचे यापूर्वीही अनेक तरुणांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप झाला होता. सध्या पोलिसांनी आरोपींना अटक करुन तुरुंगात पाठवले आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
महत्वाच्या बातम्या :-
मुंबईत क्लासवन अधिकाऱ्याच्या घरावर छापा, सापडले मोठे घबाड; पैसे मोजून अधिकारही दमले
पोलिस स्टेशनमध्ये फुटला नवऱ्याच्या अश्रूंचा बांध; म्हणाला, “बायको भांडी घासायला लावते आणि..”
7 वर्षांच्या चिमुकल्याचं होतंय तोंडभरून कौतुक, आईला हार्टअटॅक येताच ‘असे’ वाचवले प्राण






