Homeइतरपोलिस स्टेशनमध्ये फुटला नवऱ्याच्या अश्रूंचा बांध; म्हणाला, "बायको भांडी घासायला लावते आणि.."

पोलिस स्टेशनमध्ये फुटला नवऱ्याच्या अश्रूंचा बांध; म्हणाला, “बायको भांडी घासायला लावते आणि..”

सामान्यत: पतीकडून छळ झालेल्या बायका त्यांच्या पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार करतात. पण आज ग्वाल्हेरमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. ग्वाल्हेरमध्ये पत्नीकडून छळ झालेला पती आपली तक्रार घेऊन पोलिसांकडे पोहोचला. तो पोलिसांसमोर रडू लागला. त्याने पोलिसांना एका चित्रपटातील गाणे ऐकवून आपली व्यथा मांडली आहे.

या पीडित पतीने सांगितलं की, “वडिलांचं निधन झाल्यानंतर मला त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर माझं आयुष्य सुरळीत चाललं होतं. पण काही दिवसांनी माझे लग्न झालं आणि माझं आयुष्यचं बदलून गेलं.” अशा गोष्टी सांगत त्या पीडित पतीने पोलिसांकडे त्याच्या पत्नीची तक्रार केली.

“वडील जिवंत असताना घरातील सर्व निर्णय माझी आई घेत असे. मात्र लग्नानंतर आणि वडिलांच्या निधनानंतर माझ्या पत्नीने आईकडून सर्व अधिकार काढून घेतले. मी माझ्या पगारातील चार हजार रुपये खर्चासाठी देत होतो. पण माझ्या पत्नीने ते पैसे आईकडून काढून घेतले”, असे त्या पीडित पतीने सांगितले. “माझी पत्नी माझ्याकडून घरातील सर्व कामे करून घ्यायची. ती मला भांडी घासायला लावायची”, असे त्या पतीने पोलिसांना सांगितले.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पतीने सांगितले कि,”पत्नीनं माझ्या बँक खात्यातील सर्व पैसे तिच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतले. काही दिवसांनंतर पैसे परत मागितले असता पत्नीने धमकी देण्यास सुरवात केली आहे.” काहीही करून आपल्याला आपले पैसे परत मिळावेत आणि आपल्या स्वतःच्या खात्यात ते जमा करता यावेत, यासाठी मदत करण्याचं आवाहन त्या पतीने पोलिसांना केलं.

आपली व्यथा पोलिसांना सांगताना हा तरुण गाणं म्हणू लागला. “जब से हुई है शादी, आंसू बहा रहा हूं, आफत गले पडी है, जिसको निभा रहा हूं”, हे गाणं म्हणत तो पोलीस ठाण्यातच रडू लागला. पोलिसांनी त्या तरुणाची कशीतरी समजूत काढली. त्या तरुणाला शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन पोलिसांनी देऊन त्याला घरी पाठवलं.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांनतर ग्वाल्हेरचे पोलीस आयुक्त अमित सांघी यांनी या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ग्वालेर शहरामध्ये या घटनेची सध्या चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पत्नीकडून पतीला होणाऱ्या त्रासाच्या अनेक घटना समोर येत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
“पंतप्रधानांना धोका असेल तर पहिली गोळी मी खाईन” मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य
चिमुकला मुलगा आणि नवऱ्याचा मृतदेह पाहताच आईने फोडला हंबरडा
६ वर्षाच्या चिमुकल्याचा खून करून बापाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहीले…