Share

बदली झाल्यानंतरही समीर वानखेडेंचा पिच्छा सोडायला तयार नाहीत नवाब मलिक, म्हणाले..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे माजी झोनल ऑफिसर समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या दक्षता विभागाला लिहिलेल्या पत्रात मलिक म्हणाले, वानखेडे यांच्याकडे परमिट रूम आणि बारचा परवाना आहे. हा परवाना त्यांच्याकडे २९ ऑक्टोबर १९९७ पासून आतापर्यंत आहे.

मलिक यांनी पत्रात प्रश्न उपस्थित केला आणि म्हटले आहे की, केंद्र सरकारचा अधिकारी त्याच्या नावावर परमिट रूम आणि बारचा परवाना ठेवू शकतो का? कृपया प्रशासकीय गैरव्यवहाराच्या प्रकरणांचा तपास करा आणि त्याची सखोल चौकशी करा. 14 डिसेंबर 1979 ही त्यांची जन्मतारीख असल्याने ते प्रौढ नसताना बारचा परवाना त्यांच्या नावावर देण्यात आल्याच्या आरोपाला मलिक यांनी पुष्टी दिली आहे.

तसेच समीर वानखेडेंची बदली झाल्यानंतर ते म्हणाले की, त्यांची बदली करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच आहे. वानखेडेंच्या मनमानी कारभारावर चाप बसणे गरजेचे होते. कारण ते काही लोकांसाठी लॉबिंग करत होते. समीर वानखेडेंची बदली झाली असली तरी लढाई संपलेली नाही. हा लढा चालूच राहणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, जातपडताळणीबाबत चौकशी सुरू आहे. आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते सादर करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले आहे. एखादा व्यक्ती शासकीय नोकरीत असताना मनमानी कारभार करत असेल, चुकीच्या पद्धतीने अधिकाराचा गैरवापर करत असेल तर त्याच्यावर कारवाई करायला हवी.

समीर वानखेडे यांच्यासाठी भाजपचे काही लोक लॉबिंग करत असल्याचा आरोपही मलिकांनी केला आहे. पण ते असेही म्हणाले की, लॉबिंग करणाऱ्यांची नावे आता सांगणार नाही. दरम्यान, समीर वानखेडेंची दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे. सोमवारी डीआरआय दिल्लीमध्ये त्यांची बदली झाली आहे. त्यांनी सेवा मुदतवाढ मागितली नाही.

बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज ऑन क्रूझ प्रकरणात अटक केल्यानंतर ते चर्चेत आला होते आणि महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपला. आता सोमवारपासून ते दिल्लीतील डीआरआयच्या संचालकांना अहवाल देतील. एनसीबीचे उच्च अधिकारी म्हणून त्यांनी मुदतवाढ मागितली नव्हती, असे यापूर्वी सांगण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या
कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल चार दिवसांची सुट्टी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
भाकर दे म्हंटल्यावर सुनेनं सासूची मोडली बोटं, नवरा मध्ये आल्यावर त्यालापण दिली चापट
जेव्हा एका मळक्या कपड्यातील शेतकऱ्याने पूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड केले होते; वाचा पुर्ण किस्सा
VIDEO:‘त्या’ अभिनेत्रीला मिठी मारणे रितेशला पडले महागात, घरी गेल्यानंतर जेनेलियाने धु-धु धुतला

राजकारण

Join WhatsApp

Join Now