Share

…तर मी १४ दिवस काय १४ वर्षे पण तुरुंगात राहायला तयार आहे; नवनीत राणा मुख्यमंत्र्यांवर भडकल्या

गेल्या काही दिवसांपासून खासदार नवनीत राणा चांगल्याच चर्चेत आल्या आहे. हनुमान चालिसा पठणाप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच आता त्यांची प्रकृती ठिक झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. (navneet rana criticize uddhav thackeray)

आता नवनीत राणा पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आक्रमक झाल्या आहे. तुरुंगात आपल्याला अन्यायकारक वागणूक दिली गेली. मी याबाबत दिल्लीत तक्रार करणार आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. तसेच माझ्याविरोधात राज्यातील कुठल्याही भागातून निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आहे.

मला तुरुंगात डांबले गेले. मला त्या तुरुंगात खुप वाईट वागणूक दिली गेली. पण मी घाबरत नाही. मी १४ दिवस नाही, तर १४ वर्षे जेलमध्ये राहायला तयार आहे, असेही नवनीत राणा यांनी यावेळी म्हटले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.

माझा महाराष्ट्राच्या सरकारला असा प्रश्न आहे की मी अशी कोणती चूक केली, ज्याची शिक्षा मला झाली. जर रामाचे आणि आणि हनुमानाचे नाव घेणे गुन्हा असेल, तर मी १४ दिवस काय १४ वर्षे जेलमध्ये राहण्यासाठी तयार आहे. ठाकरे सरकार महिलेचा आवाज दाबू शकत नाही, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

तसेच न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करते. पण तुरुंगात माझा खुप छळ झाला आहे. जेव्हा मी आजारी पडले तेव्हा मला रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरेंना वारसा हक्काने सत्ता मिळाली आहे, ते जनतेतून निवडून येऊ शकत नाही, असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

आमचा लढा हा देवाच्या नावाचा लढा आहे. यापुढेही हा लढा सुरुच राहरणार आहे. माझ्यावर क्रुर कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्तेचा दुरुपयोग केला आहे. पण माझ्यावर कितीही संकटे आली, तरी संकटमोचनाचे नाव घेण्याचे मी थांबवणार नाही, असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुलगा कलेक्टर असूनही आई करते शेतात काम; गावातच राहून जगतेय साधेपणाने आयुष्य
भारीच! आनंद महिंद्रांनी इडली अम्मांना दिलेलं वचन केलं पूर्ण, मातृदिनाच्या दिवशीच घर दिलं भेट
सरकार नालायक असेल, तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांवर संतापले

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now