Share

रशियाच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा शेवटचा व्हिडीओ आला समोर, पाहून भावूक व्हाल

गेल्या पाच दिवसांपासून युक्रेन (ukraine) आणि रशियामध्ये (russia) भयंकर युध्द सुरु आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती आता दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रशियाने युक्रेनमधील खार्किवमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

आज सकाळपासून रशियाने युक्रेनच्या सर्व प्रमुख शहरांमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. रशियन सैन्याचा मोठा ताफा युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहराच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. आज रशियन सैन्याने युक्रेनमधील खार्किव नावाच्या शहरात हवाई हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

त्या विद्यार्थ्याचे नाव नवीन एसजी असे होते. तो मुळचा कर्नाटकचा होता. नवीनच्या निधनाची बातमी कळताच त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्युनंतर त्याच्या वडिलांचा आणि त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नवीन आणि त्याचे वडील व्हिडीओ कॉलवर बातचित करताना दिसत आहे.

दोन दिवसांपुर्वीच नवीनचा आणि त्याच्या वडिलांचा संपर्क झाला होता. आता नवीनच्या निधनानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. नवीन हा युक्रेनच्या खार्कीव्ह शहरात राहत होता. तिथे तो डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता.

तुम्हाला माहिती नसेल पण खार्किव्ह हे युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे शहर आहे. शहरात सध्या सगळीकडे धुमाकूळ माजलेला आहे. खार्किव्हमध्ये सकाळी हवाई हल्ला झाला या हल्ल्यामध्ये नवीनचा मृत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे. नवीन हा खार्किव्ह नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला शिकत होता.

त्याच्या निधनानंतर भारताला मोठा झटका बसला आहे. देशासाठी ही चिंतेची बाब आहे. या घटनेमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नवीनला भूक लागली होती आणि काहीतरी खाद्यपदार्थ आणण्यासाठी तो घराबाहेर पडला होता. यावेळी झालेल्या हवाई हल्ल्यात त्याचा जागीत मृत्यु झाला.

एका प्रशासकीय इमारतीवर रशियन सैनिकांनी हल्ला केला होता त्यावेळी नवीनचा मृत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्याचा वडिलांसोबतचा व्हिडीओ कॉल व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याचे वडिल त्याला सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्याचा सल्ला देत आहेत. तसेच तुम्हाला परत मायदेशी आणण्यासाठी भारतीय एंबेसीकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्याचे वडिल त्याला देतात.

https://twitter.com/thind_akashdeep/status/1498602976688357376?s=20&t=83VPZ7jGiMbkHZaRLK_43w

महत्वाच्या बातम्या
प्राजक्ता गायकवाडने जेजुरी गडावर घेतले खंडेरायाचे दर्शन; नंतर म्हणाली, भूलोक, पाताळलोक, स्वर्गलोक….
गुजरात टायटन्सला मोठा धक्का; ज्याच्यासाठी करोडो खर्च केले त्या स्टार खेळाडूनेच घेतली माघार
पत्नीला प्रियकरासोबत पाहून भडकला पती; केले असे काही कृत्य की वाचून हादरल
पत्नीच्या ‘या’ सवयीला कंटाळून युवराज सिंगने उचलले होते टोकाचे पाऊल, केला होता तिचा नंबर डिलीट

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now