Share

यंदाच्या महापालिका निवडणूकीत भाजपलाच अच्छे दिन, शिवसेनेला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा

मुंबई महापालिकेच्या लवकरच निवडणूका होणार आहे. या निवडणूका कधी होणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. पण सर्व पक्षातील नेते या निवडणूकांची जय्यत तयारी करताना दिसून येत आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहे. (mumbai corporate election who win bjp or shivsena)

महापालिकेच्या निवडणूच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकमेकांवर निशाणा साधताना दिसून येत आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत नक्की कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशात सट्टे बाजारात भाजपची चलती असल्याचे दिसून आले आहे.

महापालिकेच्या निवडणूकीत सत्ताधारी शिवसेनेला प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महापालिकेवरील वर्चस्वासाठी भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मुंबई महापालिकेचे बजेट ५० हजार कोटींचे असून जवळपास ८० कोटींच्या ठेवी आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीबरोबर बुकींनी गुजरात निवडणुसाठी सुद्धा सट्टा बाजार सुरु केला आहे.तसेच गुजरातच्या निवडणूकीला अजून सहा महिने बाकी असताना सुद्धा त्याच्यावर सट्टा बाजार सुरु झाला आहे. त्या ठिकाणी सुद्धा भाजपला बहुमताने विजय मिळेल, असे म्हटले जात आहे.

भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये महापालिकेच्या २३६ जागांवर लढत होणार आहे. भाजपला जवळपास १२० जागांवर विजय मिळवण्याची खात्री आहे. सध्याचा ट्रेंड पाहता हा आकडा १३० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बुकी १ रुपया देण्याच्या तयारीत आहे.

भाजप निवडणूकीत १२० जागा जिंकल्याबद्दल बुकी प्रत्येक रुपयावर १ रुपया द्यायला तयार आहे. १०० जागांपेक्षा जास्त जागांवर भाजपच्या विजयावर सट्टा लावण्यासाठी बुकींना प्रत्येक रुपयावर ०.२५ पैसे द्यावे लागतील. ११० जागांसाठी एक रुपयावर ५५ पैसे इतकी शक्यता आहे.

शिवसेना महापालिकेच्या निवडणूकीत फक्त १० ते २० जागा जिंकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रुपयाला १० पैशांपासून ६२ रुपयांपर्यंत दर देण्यात आला आहे. तसेच शिवसेनेने ४० पेक्षा जास्त जागा जिंकल्यास बुकी रुपयावर अडीच रुपये देण्याच्या तयारीत आहे. शिवसेना ४० पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही, असा अंदाज बुकींनी वर्तवला आहे.

महत्वाच्या बातम्या-
मला घटस्फोट हवाय, मी वैतागलोय; मुलाच्या जन्मानंतर भारतीच्या पतीची धक्कादायक मागणी
मांजरेकरांच्या ‘वीर सावरकर’चा पहिला लुक आला समोर; ‘हा’ बॉलिवूड स्टार साकारणार सावरकरांची भूमिका
विराटच्या खराब फॉर्मवर वीरेंद्र सेहवागचं मोठं वक्तव्य; म्हणाला, जितक्या चुका त्याने करीअरमध्ये केल्यात…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now