Share

भारतातील कोरोना मृत्यूसंख्या जास्त दाखवण्यामागे फार्मा कंपन्यांचे षडयंत्र?; मोदी सरकारच्या गंभीर आरोपांनी खळबळ

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने खुप धुमाकूळ घातला होता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीवही गेले आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोना काळात कोरोनामुळे भारतातील ४७ लाख लोकांचा मृत्यु झाला आहे, असे जागितक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. (modi government on corona death)

आता याबाबत केंद्र सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा दावा चुकीचा असल्याचे सरकारने सांगितले आहे. केंद्र सरकारने आकडेवारी जारी केली, तेव्हा त्यांनी ४.८ लाख लोकांचा मृत्यु झाल्याचे सांगितले. पण आता संघटनेने जो आकडा सांगितला, या दोघांमध्ये इतकी तफावत कशी असा प्रश्न निर्माण होत आहे.

आकडेवारीच्या तफावतीबाबत सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा एक धक्कादायक खुलासा झाला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने दाखवलेल्या कोरोना मृत्युच्या आकड्यामागे फार्मा कंपन्यांचा हात आहे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच फार्मा कंपन्यांनी असं का केलं असावं? याचं कारणही सांगण्यात आलं आहे. जागतिक बाजारातील काही फार्मा कंपन्यांना भारतात कोविड प्रतिबंधक लस विकण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे या कंपन्यांकडून चुकीची पद्धत वापरुन भारतात कोविड बळी गेल्याचा आकडा फुगवून सांगण्यात आला आहे. विशेष म्हणजे हाच आकडा आरोग्य संघटनेने त्यांच्या अहवालात मांडला आहे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत कोरोनामुळे ४,८१,००० लोकांचा मृत्यु झाल्याची बातमी समोर आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली होती. पण नंतर डब्ल्युएचओने जी आकडेवारी सांगितली, त्याने एकच खळबळ उडाली.

जागतिक आरोग्य संघटनेने जो आकडा सांगितला, तो भारतीय आकडेवारीच्या १० पट जास्त होता. त्यामुळे संपुर्ण देशभरात एकच खळबळ उडालेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जागतिक स्तरावर कोरोनामुळे जितके मृत्यु झालेत. त्यापैकी एक तृतीयांश मृत्यू भारतात झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-
कुत्र्यासारखा भुंकतोय चिमुकला मुलगा; संपूर्ण घटना ऐकून काळजाचं पाणी होईल
ताजमहालातील २२ खोल्या उघडण्यासाठी याचिका करणारांना न्यायालयाने झाप झाप झापले; म्हणाले…
एक लाख रुपये पगार देतीय ‘ही’ कंपनी; काम आहे मॅकडोनल्डमध्ये जाऊन जेवन करायचं…

ताज्या बातम्या आरोग्य

Join WhatsApp

Join Now