mns raj thackeray warning to leaders | गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरे हे मनसेवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. शहरातील राजकारणातून आपल्याला डावललं जात आहे, असे वसंत मोरे यांनी म्हटले होते. प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
तसेच वसंत मोरे यांनी फेसबूकच्या माध्यमातून पुण्यातील मनसे नेते आप्पा आखंडेंना पद देण्याची मागणी केली होती. त्यामुळे मनसेमध्ये पक्षांर्गत वाद सुरु असल्याचेही म्हटले जात आहे. अशात राज ठाकरे यांनी एक पत्रक जारी केले आहे.
राज ठाकरे यांनी ट्विट केलेल्या पत्रात त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. तसेच पक्षात वारंवार होणाऱ्या वादावर आणि प्रसारमाध्यमांसमोर बोलणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी एक इशारा दिला आहे. पुन्हा असा काही घडलं तर पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंचे पत्र-
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र, सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत.
इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही. माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला.
पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा. ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील प्रत्येकाने पक्षशिस्त पाळायलाच हवी ! pic.twitter.com/42cuKigAWk
— Raj Thackeray (@RajThackeray) December 21, 2022
महत्वाच्या बातम्या-
shahrukh khan : शाहरुखची कातडी सोलून त्याला जिवंत जाळणार अन् सलमान-आमिरला फासावर चढवणार
raj thackeray : वसंत मोरेंच्या नाराजीवर भडकले राज ठाकरे? म्हणाले, माध्यमांसमोर गरळ ओकू नका, नाहीतर…
Grampanchayat Election : ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत झाले दुध का दुध पाणी का पाणी, शिंदे-ठाकरे गटाचा निकाल वाचून बसेल धक्का