jagatguru paramhans shocking statement on shahrukh khan | शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील बेशरम रंग हे गाण्यामुळे चांगलाच वाद होत आहे. या गाण्यात दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. त्यामुळे हा वाद होत आहे. तसेच हे गाणं हटवण्यासाठी मागणी केली जात आहे.
बेशरम रंग हे गाणं हटवण्यासाठी एनएचआरसीमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या गाण्यावर वेगवेगळ्या स्तरातून विरोध होत आहे. अनेकांनी या गाण्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. अशात शाहरुख खानला संत परमहंस यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या वादात अनेक नेते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. अशात अयोध्येचे संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी एक वादग्रस्त विधाने केले आहे. त्यांनी शाहरुख खानला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान केला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
हिंदूच्या भावना दुखावण्याचं हे सुनियोजित कारस्थान आहे. हा चित्रपट जिहादी आहे. पुर्ण नियोजन करुन सिनेमाची निर्मिती केली आहे. मी त्याला शोधतोय. ज्यादिवशी मला तो जिहादी सापडेल. त्यावेळी मी त्याची कातडी सोलून त्याला जिवंत जाळून टाकीन, असे परमहंस यांनी म्हटले आहे.
माझी बरीच माणसे मुंबईत त्याला शोधत आहे. जो सनातनी सिंह त्याला प्रथम जाळेल, मी त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करेन. मी तीन लोकांची नावे लिहीली आहे. शाहरुख खानशिवाय माझ्या यादीत सलमान आणि आमिर खानचे नाव सुद्धा आहे. त्या दोघांना मला फाशीची शिक्षा द्यायची आहे, असेही परमहंस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या बेशरम रंग या गाण्याचा काही लोक तीव्र निषेध करत आहे. आरटीआय कार्यकर्ते दानिश खान यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करुन हे गाणे काढून टाकण्याची मागणी केली आहे. या गाण्यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या भावना दुखावल्या जाताय, असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
raj thackeray : वसंत मोरेंच्या नाराजीवर भडकले राज ठाकरे? म्हणाले, माध्यमांसमोर गरळ ओकू नका, नाहीतर…
amarjit pawar : नादखुळा! राष्ट्रवादीचा सरपंच झाला अन् पठ्ठ्याचा प्रण पुर्ण झाला, तीन वर्षांनंतर कापणार दाढी अन् केस
kiran agashe : दोन दिवसांवर साखरपुडा आला असतानाच तरूणीचा तडफडून मृत्यू; घटना वाचून काळीज हेलावून जाईल