Grampanchayat Election uddhav thackeray eknath shinde group | राज्यात ७७५१ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली आहे. त्यानंतर आज या निवडणूकींचे निकाल लागत आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांचा सरपंच निवडणून येत आहे. तर अनेक पक्षांना धक्क्यावर धक्के लागत आहे. तर काही ठिकाणी चांगलीच सुरस पाहायला मिळत आहे.
रविवारी ग्रामपंचायतींची निवडणूकांचं मतदान पार पडलं आहे. यात सरासरी ७४ टक्के मतदान झालं आहे. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर ३४ जिल्ह्यातल्या एकूण ७७५१ जागांची निवडणूक झाली आहे. या निवडणूकीकडे सर्वांचेच लक्ष आहे कारण शिंदेंच्या बंडखोरीनंतर ही पहिलीच इतकी मोठी निवडणूक पार पडली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढला आहे. त्यामुळे शिंदे गटाला जास्त जागा मिळतात की ठाकरे गटाला याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच थेट सरपंचाची निवड सुद्धा जनतेतून होणार आहे. त्यामुळे याचा कोणाला फायदा होतो याचीही अनेकांना उत्सुकता आहे.
आतापर्यंत ७७५१ पैकी ६९०९ ग्रामपंचायतींचा निकाल हाती लागला आहे. त्यामध्ये भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहे. १९६६ ग्रामपंचायतीमध्ये भाजप जिंकली आहे. तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस १३०६, काँग्रेस ८३८, शिंदे गट ८०२ आ ठाकरे गट ६६१ असा निकाल लागलेला आहे. तसेच १३३६ ग्रामपंचायतीत अपक्ष निवडून आले आहे.
यंदाचा निकाल हा खुपच धक्कादायक आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. त्यामुळे त्यांच्यासोबत ४० आमदार आणि १२ खासदारही बाहेर पडले. त्यानंतर शिंदे गटात अनेक नेत्यांनी प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटाला याचा चांगलाच फायदा झाला आहे.
या निवडणूकीत शिंदे गटाला ८०२ जागा मिळाल्या आहे. तर ठाकरे गटाला फक्त ६६१ जागा मिळाल्या आहे. त्यामुळे हा निकाल ठाकरे गटासाठी मोठा धक्का देणारा असल्याचे म्हटले जात आहे. अजून काही निवडणूकांचा निकाल हाती येणे बाकी आहे. त्यामुळे आता कोणला किती जागा मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Pune : हॅलो…श्रीमंत महीलांसोबत शरीरसंबंध ठेवा, तुम्हाला त्याचे पैसे देतो; पुण्यात थेट फोनवर ऑफर
shahrukh khan : शाहरुख खानची झालीय खूपच बिकट अवस्था; देतोय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज…
‘ही’ कंपनी टाटा, महिंद्राच्याही पुढे! बनवली १३ सीटर कार, किंमत आहे फक्त…