Share

शिवसेना गेली म्हणून काय झालं मनसे आहे ना; भाजपने मनसेला NDAमध्ये घेण्यासाठी आखला मोठा प्लॅन

देशभरात वेगवेगळ्या मुद्यावरुन राजकारण तापलेले दिसत आहे. अशात भाजप पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीची तयारी करताना दिसून येत आहे. भाजपची आणि शिवसेनेची युती तुटल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.

अशात भाजपने आता दुरावलेल्या मित्रपक्षांची कसर भरुन काढण्यासाठी भाजपप्रणित आघाडीचा विस्तार करण्यासाठी भाजपने रोडमॅप तयार केला आहे. त्यातून महाराष्ट्रात शिवसेनेची जागा राज ठाकरेंचा पक्ष मनसे भरुन काढणार अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एनडीएमध्ये यावे यासाठी महाराष्ट्रातील भाजपही आग्रही आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता भाजप-मनसेची युती होणार अशा चर्चांना उधाण आले आहे. तसेच राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळेही भाजप-मनसेची युती होणार अशी चर्चा रंगली आहे.

तसेच महाराष्ट्रशिवाय पंजाबमध्ये अकाली दलाच्या जागी काँग्रेसमधून बाहेर पडलेले कॅप्टन अमरिंदर सिंग, जम्मु-काश्मीरचे सज्जाद लोन यांच्यासह अनेक प्रादेशिक पक्षांना एनडीएत आणण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी देखील पुढाकार घेतला आहे. तसेच नुकतीच पंजाबची विधानसभा निवडूक झाली असून तिथे आपचे सरकार आले आहे. त्यामुळे भाजप आता आणखी मेहनत घेत आहे.

तसेच मध्य प्रदेशमध्ये गोंडवाना गणतंत्र पक्ष, पश्चिम बंगालमधील भद्र समाजावर प्रभाव टाकणाऱ्या समविचारी प्रादेशिक पक्षांना एनडीए बरोबर ठेवण्याचे, तसेच जर शक्य असेल तर नव्याने जोडून घेण्याचे प्रयत्नही भाजप करताना दिसून येत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबक आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांचा हा मुद्दा राज्यातच नाही, तर दिल्लीतही गाजताना दिसून येत आहे. राज ठाकरेंच्या सभेलाही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्यांना अनेकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता मनसेला एनडीएमध्ये घेण्यासाठी भाजप आग्रही असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-
इंडियन टॉयलेटमध्ये केला असा बदल की वृद्धांनाही बसणं झालं सोपं, गुडघ्यांचा त्रास झाला कमी
‘संभाजी भिडेंना दंगलीच्या गुन्ह्यातून क्लीन चिट देण्यात जयंत पाटलांचा हात’, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
खळबळजनक! इफ्तार पार्टीत हिंदूंच्या ताटात वाढलं गोमांस, सोशल मिडीयावर उडाला गोंधळ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now