राज्यात नुकतीच राज्यसभेची निवडणूक पार पडली आहे. यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिकांनी शिवसेनेच्या संजय पवारांना धुळ चारली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आधीच गोंधळ सुरु आहे. असे असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने मनसेबरोबर युती करुन राष्ट्रवादीची सत्ता असलेली जागा काबीज केली आहे. (mns bjp beat ncp in ahamadnagar)
गेल्या काही आठवड्यांपासून भाजप-मनसे युती होणार का? अशी चर्चा होती. असे असतानाच अहमनगर जिल्ह्यात मनसे-भाजपची युती झाली असून या युतीला निवडणूकीत यशही मिळाले आहे. पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणुक नुकतीच पार पडली, त्या निवडणुकीत या युतीने यश मिळवले आहे.
एकनाथवाडीतील कार्यकारी सोसायटी गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. मात्र यावेळी मनसे आणि भाजपने युती करत इथे सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे आता नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी आता भाजपसोबत मनसेचा झेंडाही रोवला गेला आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर आणि भाजपचे तालुका सरचिटणीस बाबा सानप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भगवान गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली श्रीकृष्ण शेतकरी पॅनल तयार करण्यात आला होता. या पॅनलने सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचा पराभव केला आहे.
तसेच महाविकास आघाडीचा पहिला प्रयोगही अहमदनगर जिल्ह्यातूनच झाला होता. आता भाजप-मनसे युतीचा प्रयोगही तिथूनच होत आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या स्तरावरही भाजप-मनसे एकत्र येतील अशी चर्चा रंगली आहे. तसेच युती झाल्यामुळे भाजप-मनसेचे कार्यकर्तेही जल्लोष साजरा करताना दिसत आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका चांगलीच चर्चेत आहे. त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मोठे वक्तव्य केले होते. तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा साधला होता. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत मनसे भाजपशी युती करणार अशी चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
“मला खासदार बनवण्यात शिवसेनेचा ५०% वाटा, फडणवीसांनी सांगीतलं तरी सेनेला एकटं सोडणार नाही”
जस्टीन बीबरच्या चाहत्यांसाठी धक्का! झालाय ‘हा’ गंभीर आजार, नीट बोलताही येईना, पहा व्हिडीओ
वयाच्या 6 व्या वर्षी झाला बलात्कार, कुटुंबाने पॉर्न इंडस्ट्रीत ढकलले, ‘हे’ काळे सत्य वाचून हादरून जाल