हिंगोलीत एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. भाचीची छेड काढल्यामुळे एका मामाने धारदार शस्त्राने एका २३ वर्षीय तरुणावर हल्ला करत त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. हिंगोली शहरातील तालाब कट्टा भागात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. (man murder 23 year old boy)
शुभम सखाराम राजे असे मयत युवकाचे नाव आहे. शुभम राजे याने बबलू सुभाष धाबे याच्या भाचीची छेड काढली होती. त्याचा राग त्याच्यासह अन्य दोन व्यक्तींच्या मनात होता. त्यामुळे शुभम राजेची हत्या करण्याचा प्लॅन त्यांनी रचला होता. त्यामुळे तो कधी एकट्यात भेटतो याची ते वाट बघत होते.
सोमवारी रात्री तालाब कट्टा भागातील एका मंदिराजवळ शुभम थांबलेला होता. त्यावेळी त्या तिघांनीही त्याला बघितले आणि त्याची हत्या करण्याचे ठरवले. त्यांनी लोखंडी पाईप, गुप्ती व खंजरने शुभमवर सपासप वार केले. हे वार शुभमच्या गळ्यावर हातावर झाल्याने तो रक्तबंबाळ झाला.
शुभमवर झालेले हे वार इतके भयानक होते की त्याचा काहीच वेळात मृत्यु झाला. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस उप निरीक्षक विक्रम विठुबाने, पोलिस हवालदार संजय मार्के आदी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवले.
याप्रकरणी पहाटे शोभा सखाराम राजे यांच्या फिर्यादीवरुन बबलू धाबे आणि अन्य दोन लोकांवर हिंगोली शहराती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्या तिघांना अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक विक्रम विठुबाने तपास करत आहे.
या घटनेवरुन लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. अनेकांनी कायदा हातात घेणे चुकीचे आहे, असे म्हटले आहे. तर काहींनी भाचीचे छेड काढल्यावर असंच करायला पाहिजे असे म्हटले आहे. पण भररस्त्यात हत्या करण्यात आल्यामुळे तिथल्या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
KGF 2 ब्लॉकबस्टर होताच संजय दत्तचे पालटले नशीब, आता ‘या’ दिग्दर्शकाशी केली हातमिळवणी
‘रावणाने सीतेचे अपहरण करून कोणताही मोठा गुन्हा केला नाही’, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान
चारधाम यात्रेत फक्त हिंदूंना प्रवेश; मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचे मोठे वक्तव्य, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले….