केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामुळे महिलांना, जेष्ठांना मोठा फायदा होणार आहे. या अर्थसंकल्पात महिलांसाठी वेगवेगळ्या योजना सादर करण्यात आल्या आहे.
आता आम्ही तुम्हाला महिलांच्या एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत,जी या अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे. ही बचत योजना आहे. महिला सन्मान बचत पत्र असे या योजनेचे नाव आहे. अर्थमंत्र्यांनी भाषणात सांगितले की, ही योजना मार्च २०२५ पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल.
या योजनेत महिला किंवा मुली यांना गुंतवणूकीची संधी मिळणार आहे. तसेच या अल्पबचत योजनेच्या माध्यमातून महिलांना ७.५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. त्यामुळे महिलांनी जर २ लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना यातून घरबसल्या १५ हजार रुपये मिळतील.
अर्थसंकल्पानुसार, महिला सन्मान बचत पत्र योजनेत जास्तीत जास्त ठेव रक्कम २ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे याचा महिलांसह मध्यमवर्गीय मुलींना सुद्धा फायदा होणार आहे. तसेच या योजनेत गुंतवणूकदारांना थोडे पैसे काढण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली आहे.
महिला सन्मान बचत पत्रात सरकारने ७.५ टक्के व्याजदर निश्चित केला आहे. तसेच एक महिला या योजनेत जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करु शकते. त्यामुळे ७.५ टक्के दराने तिला १५ हजार रुपये मिळू शकतात.
तसेच जेष्ठ नागरिकां बचत योजनेची रक्कम ही आता १५ लाख रुपयांवरुन ३० लाख रुपये करण्यात आल्याची निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूकीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता एखादी व्यक्ती त्यामध्ये ९ लाख रुपयांपर्यंत पैसे गुंतवू शकते.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे नेते मानस पगार यांचे अपघाती निधन; सर्वपक्षीय तरूण हळहळले
हार्दिकने पृथ्वीकडे, तर पृथ्वीने ‘या’ वृद्ध काकांकडे सोपवली ट्रॉफी; विजयानंतर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
शुभमन गिलचे शतक आणि गोलंदाजांचा जलवा, भारताचा न्युझीलंडविरूद्ध सर्वात मोठा विजय