नाशिक : नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे आकस्मिक निधन झाले. मानस पगार हे युवक काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जात होते. ते सोशल मीडियावर काँग्रेसच्या भूमिकेचा आक्रमकपणे प्रचार करत होते.
त्यामुळेच पक्षानेही त्यांच्या कामाची दखल घेऊन लक्ष काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. मात्र, बुधवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. (youth congress nashik district president manas pagar passes away in accident)
मानस पगार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर केलेल्या आंदोलनाची संपूर्ण राज्यात चर्चा होती. दानवेंनी शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याने त्यांच्या घरासमोर उपोषण करण्यात आले. यामध्ये मानस पगार आणि त्याच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली.
त्यांच्या सुटकेसाठी युवक काँग्रेसने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती. पगार यांच्या निधनानंतर युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे.
तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भावपूर्ण श्रद्धांजली माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे.”
भावपूर्ण श्रद्धांजली
माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे. pic.twitter.com/R7Qfcv5aRr
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 2, 2023
दरम्यान, 2020 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युवा जोडो अभियान (सुपर 1000) अभियान 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने सुरू केलेल्या सुपर सिक्स्टी अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. या मोहिमेसाठी मानस पगार यांच्याकडे मुख्य समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली होती.