भारताने न्युझीलंडविरूद्ध तिसरा टी-२० सामना सहज जिंकला. तब्बल १६८ धावांनी भारताने न्युझीलंडला धुळ चारली. गोलंदाजांनी न्युझीलंडच्या अक्षरक्ष नाकी नऊ आणले होते. हार्दिक पांड्याने गोलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी केली. सुर्यकुमार यादवनेही जबरदस्त झेल घेत न्युझीलंडच्या फलंदाजांना पवेलियनमध्ये पाठवले.
काही क्षणात न्युझीलंडचे सगळे फलंदाज बिखरले. भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला होता. मात्र मालिकेतील तिसऱ्या सामन्यात गिलने शानदार शतक ठोकले आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
गिलने गेल्या महिन्यातच श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या सामन्यापूर्वी त्याने साधे अर्धशतकही ठोकले नव्हते. शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने न्युझीलंडला तब्बल २३५ धावांचे लक्ष्य दिले होते. शुभमन गिलने 54 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
या खेळीत त्याने १० चौकार आणि ५ षटकार मारले. त्याने चौकारांच्या मदतीने आपले शतक पुर्ण केले. त्याने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते मात्र नंतर त्याने जोरदार कमबॅक केला. यानंतर गिलने वेगवान धावा करण्यास सुरुवात केली. याआधी त्याने देशांतर्गत टी-२० मध्ये केवळ एकच शतक झळकावले होते.
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि मिचेल सँटनरने मायकेल ब्रेसवेलला दुसरे षटक देऊन मास्टर स्ट्रोक खेळला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशान किशनला एलबीडब्ल्यूवर बाद केले.
त्यानंतर राहुल त्रिपाठीनेही २२ चेंडूत ४४ धावा ठोकल्या. त्याने फर्ग्युसनला लागोपाठच्या चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याने गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूत ८० धावा जोडल्या. न्यूझीलंडची सुरुवात खुपच खराब झाली. हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात फिन ऍलनला बाद केले.
अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात डेव्हॉन कॉनवे (१) आणि मार्क चॅपमन (०) यांचे बळी घेतले. तिसऱ्या षटकात हार्दिकने ग्लेन फिलिप्सलाही माघारी पाठवले. मायकल ब्रेसवेलला ५ व्या षटकात उमरान मलिकने बोल्ड केले. ६ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ३० होती आणि त्यांचे तब्बल ५ फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर पुर्ण टीमच ढासळत गेली आणि भारताने हा सामना सहज जिंकला.
महत्वाच्या बातम्या
अजिंक्य रहाणेचा संयम सुटला! टिम इंडीयात संधी मिळत नसल्याने ‘या’ देशाच्या संघाकडून खेळणार
आनंदाची बातमी! ‘इतक्या’ लाखांच्या पगारावर आता नाही भरावा लागणार इनकम टॅक्स, मोदी सरकार करणार घोषणा
कोट्यवधी LIC धारकांना सुखद धक्का, ‘अदानी’च्या शेअर्सबाबत LIC ने दिली हैराण करणारी माहिती
३ दिवसात ३ लाख कोटींची राख, हिंडेनबर्गने अदानींची दुनियाच हादरवली; श्रीमंतांच्या टॉप टेनमधून बाहेर