Share

लिंबाचे भाव इतक्या झपाट्याने का वाढत आहे? धक्कादायक कारण आले समोर

सध्या देशातील बहुतांश शहरांमध्ये भाज्यांचे भाव झपाट्याने वाढले आहेत. या सगळ्यात लिंबाच्या भावाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. लिंबाचा भाव ३५० ते ४०० रुपये किलो झाला आहे. लिंबाच्या वाढलेल्या किमतीचा फटका केवळ ग्राहकांनाच नाही तर दुकानदारांनाही बसला आहे. पण लिंबाचे भाव वाढण्यामागेही काही हैराण करणारे कारणं आहेत. (lemon price hike reason)

देशभरात लिंबाचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील ज्या भागात लिंबूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते त्या भागाला कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. उष्णतेमुळे लिंबू उत्पादनावर परिणाम झाला आहे. लिंबू सुरुवातीच्या काळात नष्ट होत असल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे.

सोसाट्याचा वारा आणि उष्णतेमुळे लिंबू गळून पडत असल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या भागात लिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या भागात उकाडा वाढत आहे. उष्णतेमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.

तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे वाहतूक शुल्कात वाढ झाली आहे. एकीकडे लिंबाचा तुटवडा आणि दुसरीकडे वाढलेले वाहतूक शुल्क, या दोन्ही गोष्टी लिंबाच्या महागाईला कारणीभूत आहेत. यावेळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून येणाऱ्या लिंबाच्या भाववाढीला डिझेलचे दरही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.

डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मालवाहतुकीतही १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे लिंबाच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. तसेच लग्नसराईचा हंगामही सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत सोहळ्यासाठी लिंबाची मागणी आणखी वाढली आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त, त्यामुळे लिंबाच्या दरातही वाढ होताना दिसत आहे.

उन्हाळ्यात उसाच्या रसापासून लिंबूपाणीपर्यंत सर्वत्र लिंबाची गरज असते. अशा स्थितीत या दिवसाआधीच लिंबाचे भाव वाढले आहेत. तसेच सध्या रमजानचा महिनाही सुरु आहे. उपवासतही लिंबाचा वापर जास्त केला जातो. त्यामुळे साठा कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे लिंबाचे भाव वाढताना दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-
Xiaomi च्या दमदार 4K smart TV वर मिळतोय ‘एवढ्या’ हजारांचा डिस्काऊंट, आताच खरेदी करा नाहीतर..
KGF 2 मध्ये दिग्दर्शकांकडून झाल्यात ‘या’ चुका, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हा तर लोचा झाला रे’
ज्या दिवशी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी.., नवनीत राणांनी केले मोहन भागवतांचे समर्थन

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now