kolhapur pranav patil passaway on birthday | कोल्हापूरच्या करवीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. प्रणव प्रकाश पाटील असे त्या तरुणाचे नाव होते. लवकरच त्याच्या बहिणीचे लग्न होते. पण अशातच प्रणवच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर आईलाच त्याने आधार दिला होता. स्वत:च्या कमाईतून त्याने घर बांधले होते. त्याचं लग्नही झालं होतं. बहिणीचेही लग्न लवकरच होते. पण काळाने सर्व काही संपवले. २५ वा वाढदिवस साजरा करण्याची लगबग सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.
वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्यामुळे त्याच्या जीवनाचा प्रवास अर्ध्यावरच थांबला आहे. वाढिवस असल्यामुळे मित्रांनी स्टेटस ठेवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण दुर्देवाने काही तासातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे शुभेच्छांचे स्टेटस श्रद्धांजलीच बदलले. प्रणवच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबासह मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे.
वडिलांचे छत्र हरपल्यामुळे खुप कमी वयात त्याच्यावर जबाबदारी आली होती. पण त्याने शिक्षण पुर्ण केले आणि तो एका फायनान्स कंपनीत कामाला लागला. तो मनमिळाऊ मेहनती आणि प्रामाणिक होता. त्याला कुठल्याप्रकारचे व्यसनही नव्हते. दीड वर्षांपूर्वी त्याने एक घरही घेतले होते.
नवीन घरात आपला दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. वाढदिवासाची तयारी सुरु असतानाच त्याच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यामुळे तो रुग्णालायत गेला. त्याने टेस्टही केली. पण ती सगळी ठिक होती. त्यामुळे तो घरी आला आणि आराम करु लागला. पण संध्याकाळी अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे तो खाली पडला.
प्रणवला असा अचानक पडलेला पाहून त्याची आई आणि बहिण खुप घाबरली. त्यानंतर त्यांनी शेजारच्यांना बोलावले आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत प्रणवचा मृत्यू झालेला होता. इतक्या तरुण वयात प्रणवचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या-
beed : घाबरलेले बैल थेट तलावात गेल्यामुळे मोठा अपघात, पाण्यात बुडून आजोबा आणि नातवाचा मृत्यू
aditya thackeray : सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंनीच रियाला पुरवली सुरक्षा? रीया म्हणाली मी स्वतःच सांगत होते की…
shivsena : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, संजय राऊतांना जामीन मिळवून देणाऱ्या नेत्यालाच घेतलं आपल्या गटात